KRK On Kriti Sanon's Shehzada Not Hit : बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच (KRK) हा सतत चर्चेत असतो. केआरके पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट शेअर करत अभिनेत्री क्रिती सेननवर (Kriti Sanon) निशाणा साधला आहे. केआरकेनं क्रितीला चक्क पनौती असं म्हटलं आहे. त्यानंतर केआरकेला क्रितीच्या चाहत्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. केआरके क्रितीला नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'शहजादा' (Shehzada) या चित्रपटावरून बोलला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगली कमाई करत नसल्याचे दिसत नाही असं म्हणतं केआरकेनं क्रितीला ट्रोल केलं आहे.
केआरकेने क्रिती सेननला पनौती म्हटले आहे. तो म्हणाला की क्रिती ज्या चित्रपटांमध्ये असते ते फ्लॉप होतात. केआरके क्रितीला हे शहजादा या चित्रपटाच्या कमाईवरून बोलला आहे. मात्र, केआरकेचे हे वक्तव्य क्रितीच्या चाहत्यांना आवडली नाही. नेटकऱ्यांनी केआरकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
Actress #KritiSanon is one of the most Panauti actress in the Bollywood. Jis film main Aati hai, Le Doobti hai. Bhediya Jaisi Film Ko Bhi Kha Gayee Thi.
— KRK (@kamaalrkhan) February 18, 2023
केआरकेनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. त्यानं कमेंट करत 'क्रिती सेननला बॉलिवूडची सगळ्यात मोठी पनौती म्हटले आहे. ज्या चित्रपटात दिसते तो फ्लॉप होतो. भेडिया सारखा चित्रपट देखील फ्लॉप झाला. केआरके इथेच थांबला नाही. त्याने क्रिती सेननचा आगामी चित्रपट आदिपुरुषवरही भाष्य केले. 600 कोटी बजेटच्या आदिपुरुषाची मुख्य अभिनेत्री देखील ती आहे. ' या ट्वीटवर अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी त्याला सडेतोड उत्तर देत म्हणाला की 'तू पनौती आहेस ज्या चित्रपटाविषयी काही बोलतोस तो फ्लॉप होतो.'
Aur Abhi Toh Maha Panauti #KritiSanon Ka Jalwa BaaKi Hai. ₹600Cr budget Ki Film #Adipurush Ki heroine Bhi Wahi Hai. Jai Ho Kriti Sanon Ki.
— KRK (@kamaalrkhan) February 18, 2023
दरम्यान, दुसरीकडे प्रभास (Prabhas) आणि क्रितीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. प्रभास आणि क्रिती पहिल्यांदाच (Adipurush) 'आदिपुरुष'मध्ये एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत. 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सोशल मीडियावर टीझर विरोधात जोरदार टीका झाली आहे. व्हीएफएक्सपासून ते कलाकारांच्या लूकपर्यंत सगळ्याच गोष्टीवर त्यांना ट्रोल करण्यात आलं. दरम्यान, जे चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. त्यांना अजून थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागेल. कारण सर्वात आधी हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता त्याच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे.