लागिर झालं जी मालिकेतील शितलीचं दिवसाचं मानधन?

लागीर झालं जी या मालिकेतून घरा घरात पोहोचली शिवानी बावकर. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 13, 2018, 12:09 AM IST
लागिर झालं जी मालिकेतील शितलीचं दिवसाचं मानधन? title=

मुंबई : लागीर झालं जी या मालिकेतून घरा घरात पोहोचली शिवानी बावकर. शिवानी बावकर ही सध्या प्रत्येकाचीच आवडीची होत चालली आहे. अजिंक्यला आपल्या मनातील भावना अगदी बिनधास्तपणे सांगणी शितली. 25 वर्षीय शिवानी बोरकर आपल्या या मालिकेतून किती मानधन घेते हे जाणून घ्यायला प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचं असतं. शिवानी ही केवळ २५ वर्षांची असली तरी तिची कमाई ही खूपच जास्त आहे. शिवानी एका दिवसात किती रुपये कमवते हे ऐकले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

लागीरं झालं जी या मालिकेच्या चित्रीकरणासाठी केवळ एका दिवसाचे ती २०-२५ हजार रुपये घेत असल्याची जोरदार चर्चा आहे.

हा आकडा कोणीही अधिकृत रित्या सांगितलेला नाही. तर हा इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे शिवानी दिवसांची कमाई खरंच इतकी आहे का हे केवळ तीच आपल्याला सांगू शकते. 

शिवानी बोरकर साकारतेय शितलीची भूमिका

 या मालिकेत शीतलची भूमिका अभिनेत्री शिवानी बावकर ही साकारते आहे. शिवानी मुळची पुण्याची असून ती केवळ २५ वर्षांची आहे. तिला लहानपणापासून अभिनयाची आवड असल्याने ती अभिनयक्षेत्रात आपले नाव कमवण्यासाठी गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईत राहात आहे. 

शिवानी सध्या लागीरं झालं जी या मालिकेत काम करत असली तरी तिने याआधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अगले जन्म मोहे बिटिया ही किजो, फुलवा यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये शिवानी झळकली होती. तसेच तिने देवयानी, सुंदर माझं घर यांसारख्या मराठी मालिकांमध्ये देखील छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मालिकांप्रमाणे चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. उंडगा हा तिचा चित्रपट काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.