मामी शीतलीचं कॉलेज बंद करण्यात यशस्वी होईल का?

भैय्या शितलीला त्रास देईल का? 

मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या १८ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात शीतल पासून झाली. शीतल गावातील आर्मी ट्रेनिंगला न येणाऱ्या मुलांना जाऊन भेटते. तेव्हा त्या मुलांच्या घरच्यांकडून तिला बोलणी ऐकायला मिळते आणि शीतल निराश होऊन घराकडे निघते. तेव्हा तिला भय्या मध्येच अडवतो आणि रात्री आमच्या घरी ये की ट्रेनिंगसाठी , हे ऐकताच शीतल भय्यावर भडकते. तेव्हा तिला कळते हे सारं भय्याचं कारस्थान आहे व तिच्या घरच्यांना घराबाहेर काढायचं ही कारस्थान त्याचंच होतं. दुसरीकडून आर्मी कॅम्प मध्ये रूम मिळविण्या वरून अज्याला त्याचे वरिष्ठ कधीकारी चांगलेच सुनावतात. पण माझं लग्न आणि संसार ड्युटीच्या आड कधीच येणार नाही असे अज्या आपल्या वरिष्ठांना सांगतो.

तिकडे जयडी पुष्पाला म्हणते जीजी ला थोडे दिवस घराबाहेर काढ. मग आपण शीतलला घराबाहेर काढू. तेवढ्यात शीतल घरी येते. तिला पाहून जयडी नाटक सुरु करते आणि मोठ्या शिताफीनं शीतलला जीजीला उमरसच्या मावशीकडे पाठवण्यास तयार करतात. दुसऱ्या दिवशी शीतलच्या सांगण्यावरून जीजी उमरसला निघून जाते. जी जी घराबाहेर पडताच पुष्पा शीतलचा समाचार घायला सुरुवात करते आणि म्हणते उद्यापासून गावभर मिरवायचं असेल तर कॉलेज बंद करून टाकीन. तेव्हा शीतल म्हणते माझं कॉलेज तेवढं बंद करू नका. काही वेळाने राहुल्या अज्याला फोन करून सांगतो आर्मी ट्रेनिंगसाठी एकही मुलगा येत नाही, तेव्हा त्याच्या हातातून फोन काढून घेऊन शीतल अज्याला काही काळजी करू नका असे सांगून अज्याला निश्चिंत करून फोन ठेवते. दरम्यान हे सारं अज्याला सांगितल्यामुळे राहुल्यावर चिडते. पुष्पा शीतलचा कॉलेज बंद करण्यास यशस्वी होईल का हे बघण्यासाठी लागिरं झालं जी या मालिकेचा पुढील एपिसोड बघायला विसरू नका.