स्वातंत्र्य दिन: 'लागीर झालं जी' स्पेशल एपिसोड

स्वातंत्र्य दिन स्पेशल ऐपिसोड

Updated: Aug 14, 2018, 04:10 PM IST
स्वातंत्र्य दिन: 'लागीर झालं जी' स्पेशल एपिसोड title=

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'लागीर झालं जी' ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या घराघरात ही मालिका पोहचलेली आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही मालिका स्वातंत्र्य दिनानिमित्त एक स्पेशल एपिसोड घेऊन येत आहे. अजिंक्य शिंदे याचा सामान्य मुलापासून ते सैनिक होण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेमध्ये दाखवला जात आहे.

देशामध्ये सगळीकडे स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु आहे. स्वातंत्रदिनाचा उत्साह कायम असतांनाच लागीर झालं जी हा मालिका 15 ऑगस्ट रोजी एक स्पेशल एपिसोड घेऊन येत आहे.