Lalit Modi Sushmita Sen: ललित मोदी आणि सुष्मिता सेनमध्ये ब्रेकअप? नेमकं काय बिनसलं

ललित मोदी-सुष्मिता सेनमध्ये अवघ्या दीड महिन्यातच 'का रे दुरावा?' 

Updated: Sep 3, 2022, 06:33 PM IST
Lalit Modi Sushmita Sen: ललित मोदी आणि सुष्मिता सेनमध्ये ब्रेकअप? नेमकं काय बिनसलं title=

Lalit Modi Sushmita Sen: अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांचा ब्रेकअप (breakup) झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. याला कारणही तसंच ठरलं आहे. सुष्मिता सेनबरोबरचं आपले नातेसंबंध जाहीर केल्यानंतर ललित मोदी यांनी इंस्टाग्रामवर (Instagram) एक लांबलचक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी सुष्मिता सेनला  (Sushmita Sen) आपली अर्धांगिनी म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी सुष्मितासोबतचा फोटोही इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर लावला होता. पण आता ललित मोदी (Lalit Modi) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सुष्मिता सेनचा फोटो हटवला आहे.

इन्स्टाग्राम प्रोफाईलमध्ये सुष्मिताचा फोटो
ललित मोदी यांनी 15 जुलैला इन्स्टाग्रामवर आपला प्रोफाईल फोटो बदलला होता. याचीच चांगलीच चर्चा रंगली होती. आपल्या प्रोफाईलमध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनबरोबरचा फोटो लावला होता. फोटोबरोबर त्यांनी लिहिलं होतं, सुष्मिता सेनबरोबर नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. सुष्मिता सेनचा त्यांनी 'pritner in crime' आणि 'my love' असा उल्लेख केला होता.

प्रोफाईमधून सुष्मिताचा फोटो हटवला
या गोष्टीला दीड महिना होत नाही तोच, ललित मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलमधून सुष्मित सेनचा फोटो आणि नाव हटवलं आहे. त्यांनी प्रोफाईल फोटो बदलला असून यात त्यांनी आपला एक हसतानाचा फोटो लावला आहे. फोटोच्या मागे आयपीएल (IPL) लिहिलं असून ललित मोदी यांनी स्वत:चं आयपीएलचे संस्थापक (IPL Founder) म्हणून वर्णन केलं आहे. 

युजर्सने उपस्थित केले प्रश्न
ललित मोदी यांनी प्रोफाईल फोटो बदलताच या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचा ब्रेकअप झाला आहे का? असा प्रश्न विचारला आहे.