'ज्यांना हे जमत नाही त्यांनी...', सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये ललित मोदींची पोस्ट चर्चेत

ललित मोदी यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Updated: Jul 24, 2022, 06:18 PM IST
'ज्यांना हे जमत नाही त्यांनी...', सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये ललित मोदींची पोस्ट चर्चेत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सुष्मिता गेल्या अनेक दिवसांपासून ललित मोदी यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत डेट करत आहोत आणि लवकरच गोड बातमी देणार आहोत अशी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर स्वत: सुष्मिताने या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं. त्यानंतरही ट्रोल होत असल्याने दोघांनी स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, आता ललित मोदींनी पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

ललित मोदींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. अनेकांनी ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या वयावरुन त्यांना ट्रोल केले. तर दुसरीकडे तर कुणी मोदी यांचे भारतातून पळून जाणे, त्यांच्यावर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप याचा संबंध सुष्मिता सेनशी जोडल गेलं. तर त्या सगळ्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी ही पोस्ट शेअर करत , 'ज्यांना हे जमत नाही त्यांनी जे करतात त्यांना त्रास देऊ नये', अशी ही पोस्ट शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ललित मोदी हे एक व्यावसायिक आहेत. व्यावसायिक दृष्ट्या दारू, सिगरेट आणि पान मसाल्याचे ब्रॅंड आणि काही स्टोर्स, रेस्टॉरंट आणि ट्रॅव्हल कंपन्या देखील ललित मोदी यांच्या आहेत. ललित हे २०१० मध्ये भारत सोडून परदेशात गेले होते. लंडनमध्येच त्यांच एक आलिशान घर आहे. लंडनमधील त्यांचा बंगला हा ७ हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. या बंगल्यात ८ बेडरूम आहेत. या बंगल्यात राहण्यासाठी ललित मोदी हे दर महिन्याला २० लाख रुपये भाडं देतात. 

ललित यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर ते त्यातून कोट्यवधींची कमाई करतात. भारताव्यतिरिक्त पश्चिम आफ्रिका, दक्षिण-पूर्व आफ्रिका, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्यांचा व्यवसाय आहे. त्यांची एकूण संपत्ती १२ हजार कोटींच्या आसपास आहे.  

किती आहे सुष्मिता सेनची एकूण संपत्ती? 

मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिता वर्षाला ९ कोटी तर महिन्याला ६० लाख रुपये कमावते.  सुष्मिताकडे जवळपास १०० कोटींची संपत्ती आहे. सुष्मिता तिच्या दोन्ही मुलींसोबत मुंबईतील वर्सोवा या परिसरात एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. तर सुष्मिताच्या कार कलेक्शनबद्दल बीएमडब्ल्यू ७ सीरिज ७३० एलडी आहे. या गाडीची किंमत ही जवळपास १. ४२ कोटी रुपये आहे. याशिवाय बीएमडब्ल्यू एक्स ६ असून तिची किंमत ही १ कोटी रुपये आहे. तर,  ८९.९० लाख रुपये किंमत असलेली ऑडी क्यू ७ देखील आहे. सुष्मिता एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ४ कोटी रुपये मानधन म्हणून घेते. तर या सगळ्यावरुन हे स्पष्ट होतं की, ललित आणि सुष्मितामध्ये सर्वात जास्त श्रीमंत ललित मोदी आहेत.