वयाच्या नव्वदाव्या वर्षी दीदी इन्स्टाग्रामवर

इन्स्टाग्रामवर काही तासातच त्यांचे ४७ हजार चाहते झाले आहेत.

Updated: Sep 30, 2019, 06:58 PM IST
वयाच्या नव्वदाव्या वर्षी दीदी इन्स्टाग्रामवर title=

मुंबई : भारत देशाच्या गान कोकीळा लता मंगेशकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. ट्विटरवर त्याचं एक ट्विट काही क्षणात चर्चेचा विषय ठरतो. आता त्यांनी वयाच्या ९०व्या वर्षी इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Namaskar. Aaj pehli baar aap sabse Instagram pe jud rahi hun.

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar) on

ट्विटरवर कायम सक्रिय असणाऱ्या लता दीदींनी वाढदिवसानंतर दोन दिवसांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. इन्स्टाग्रावर त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'आज पहिल्यांदाच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसोबत संवाद साधत आहे.' असे लिहिले आहे. 

इन्स्टाग्रामवर काही तासातच त्यांचे ४७ हजार चाहते झाले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावर चाहते त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मीना मंगेशकर खडीकर यांनी लता दीदींवर आधारित 'दीदी और मैं' पुस्तक प्रकाशित केलं. ‘माणसाला पंख असतात’, ‘शाबाश सुनबाई’, ‘रथ जगन्नाथाचा’, ‘कानून का शिकार’ अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांना मीनाताईंचे संगीत आहे.