ऋषी कपूर यांच्या अस्थिविसर्जनावेळीसुद्धा कपूर कुटुंबाला आलियाची साथ

ऋषी कपूर यांच्या एक्झिटने सारं कलाविश्व आणि चाहतावर्ग हळहळलं. 

Updated: May 5, 2020, 08:39 AM IST
ऋषी कपूर यांच्या अस्थिविसर्जनावेळीसुद्धा कपूर कुटुंबाला आलियाची साथ title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि साऱ्या हिंदी कलाविश्वात एक काळ गाजवत 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Rishi Kapoor ऋषी कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला प्रदीर्घ काळासाठी आजाराशी अतिशय खंबीरपणे लढा देणाऱ्या ऋषी कपूर यांच्या एक्झिटने सारं कलाविश्व आणि चाहतावर्ग हळहळलं. अशा या अभिनेत्याचं अस्थिविसर्जन नुकतंच मुंबईतील बाणगंगा येथे करण्यात आलं. 

रविवारी कपूर कुटुंबातील काही सदस्य, पत्नी नीतू कपूर, मुलगा रणबीर कपूर आमि मुलगी रिद्धीमा कपूर यांच्या उपस्थितीत अस्थिविसर्जन पार पडलं. सोशल मीडियावर या क्षणांचे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. ज्यामध्ये रणबीर कपूरची प्रेयसी, अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा कपूर कुटुंबीयांना धार देताना दिसली. तर, रणबीरचा खास मित्र, दिग्दर्शक अयान मुखर्जी हासुद्धा यावेळी अस्थिविसर्जनासाठी उपस्थित राहिला होता. 

वृत्तसंस्थेला ऋषी कपूर यांचे ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतच अस्थिविसर्जन करावं लागलं. कारण कोरोना व्हायरसमुळे सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या काळात हरिद्वारला जाण्यासाठीची परवानगी मिळाली नाही. 

 

वयाच्या ६७ व्या वर्षी ऋषी कपूर यांनी ल्युकेमियाशी प्रदीर्घ काळासाठी लढा दिल्यानंतर अखेरचा श्वास घेतला. मुंबईत मोजक्या उपस्थितांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. लॉकडाऊनमुळे त्यांची मुलगी रिद्धीमा हिला मात्र दिल्लीतून आपल्या वडिलांच्या अत्यदर्शनासाठी उपस्थित राहता आलं नाही. अतिशय भावुक वातावरणात ऋषी कपूर यांना चाहत्यांनीही शेवटचा निरोप दिला. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x