Ghanshyam Nayak Death | 'तारक मेहता का...' फेम Nattu Kaka उर्फ घनश्याम नायक यांचं निधन

घनश्याम नायक (Ghanshyam Nayak Death) यांचं वयाच्या 77 वर्षी निधन झालं आहे.  

Updated: Oct 3, 2021, 07:53 PM IST
Ghanshyam Nayak Death | 'तारक मेहता का...' फेम Nattu Kaka उर्फ घनश्याम नायक यांचं निधन

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील 'नट्टू काका' (Nattu Kaka) ही भूमिका बजावणारे घनश्याम नायक (Ghanshyam Nayak Death) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 77 वर्षी त्यांचं निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कॅन्सरवरचे उपचार सुरु होते. मात्र त्यांची कॅन्सर विरुद्धची झुंज अपयशी ठरली. तारक मेहता या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी ट्विट करत निधनाची बातमी दिली आहे. (Legendary senior actor ghanshyam Nayak aka nattu kaka of Taarak Mehta Ka Ooltah Chashmah passed away at age of 77)

चाहत्याचं खळखळून हसवणाऱ्या नट्टू काकांचं निधन झाल्यानं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी दशकापेक्षा अधिक काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतून ते घराघरातील प्रत्येक व्यक्तीला माहिती झाले. त्यांचं गुजराती रंगभूमीसाठीचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यांनी अनेक गुजराती नाटकात काम केलं आहे.