मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन (Lisa Haydon) पुन्हा एकदा आई होणार आहे. तिसऱ्यांदा लिसाच्या घरी तान्हा बाळाचा आवाज ऐकू येणार आहे. लिजाने अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या तिसऱ्या प्रेग्नेसीबद्दल माहिती दिली आहे. आपल्या चाहत्यांना तिसऱ्यांदा आई (Lisa Haydon Announces Third Pregnancy) होण्याचा आनंद तिने एका व्हिडिओतून शेअर केला आहे.
लिजाने आपल्या मोठ्या मुलासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. लिजाने या व्हि़डिओच्या कॅप्शनमध्ये आपलं तिसरं बाळं जून महिन्यात येणार असल्याची गुड न्यूज दिली आहे.
लिसा हा सुपरक्यूट व्हि़डिओ पोस्टबद्दल बोलायचं झालं. तर यामध्ये लिसाने आपल्या मुलाला विचारलं आहे की,'आईच्या पोटात काय आहे? यावर लिसाचा मोठा मुलगा जॅक लालवानीने अतिशय सुंदर उत्तर दिलं आहे. 'माझी बहिण.' या उत्तराने लिसाचं काय चाहते देखील खुष झाले आहेत. या अगोदर लिसाला दोन मुलगे आहेत. हे संपूर्ण कुटूंब आता एका मुलीच्या आगमनाची वाट पाहत आहेत.
२५ जानेवारी रोजी लिसाचा छोटा मुलगा एक वर्षांचा झाला. या अगोदर दोन वेळा लिसाने प्रेग्नेंसीच्या वेळचे बेबी बंपचे फोटो शेअर केले होते. लिजा बिकिनीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे शानदार फोटो शेअर करत तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
लिसा हेडनने २९ ऑक्टोबर २०१६ मध्ये आपल्या बॉयफ्रेंड डिनो ललवानीसोबत लग्न केलं. दोघांनी थायलँडमध्ये असलेल्या अमनपुरी बीच रिसॉर्टवर लग्न केलं आहे. याचे फोटो देखील लिसाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. लिसाचा नवरा पाकिस्तान मूळ असलेल्या ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानीच्या मुलासोबत लग्न केलं आहे. डिनो आणि लिसाने दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं.