मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन अलीकडेच एका सुंदर मुलीची आई बनली आहे. म्हणूनच या दिवसांत ती आपला सगळा वेळ तिच्या कुटुंबाला देत आहे. तिच्या नवजात मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून उत्सुक होते.
लिसा कुटुंबाला देते भरपूर वेळ
लिसा हेडन चित्रपटांपासून दूर आहे, मात्र ती तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आजकाल ती फक्त सोशल मीडियावर प्रमोशनल व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते.
लिसा हेडनच्या मुलीची झलक
अलीकडेच, लिसा हेडनचा पती दिनो लालवानीने आपल्या मुलीचे लिसासोबतचे पहिले फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. फोटोमध्ये लिसा आपल्या मुलीसोबत फोटोशूट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करण्याबरोबरच त्याने आपल्या मुलीचं नावही उघड केलं आहे. चाहत्यांकडून लिसाच्या या फोटोला खूप पसंती मिळत आहे.
फोटो शेअर करून नाव उघड
या फोटोंमध्ये, लिसाची मुलगी तिच्या हातांमध्ये दिसत आहे. लिसाचे पती डिनो लालवानी यांनी इन्स्टाग्रामवर पदार्पण करत लिहिलं, 'लिसा हेडन आणि माझी मुलगी लारा.' डिनोने असंही सांगितलं आहे ,त्याने त्याच्या मुलांचे फोटो शेअर करण्यासाठी फक्त एक इंस्टाग्राम पेज तयार केलं आहे.
या पोस्टसोबत, डिनोने आपल्या बाळाचं नाव देखील उघड केलं आहे. त्याने सांगितलं की, त्याने आपल्या मुलीचं नाव लारा ठेवलं आहे. यानंतर, लिसाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये देखील हे फोटो शेअर केले आहेत.
बॉयफ्रेंड दिनो लालवानीसोबत 2016 मध्ये केलं लग्न
फॅशन इंडस्ट्रीमध्ये छाप पाडल्यानंतर लिसाचं फिल्मी करिअर 2010 मध्ये 'आयशा' या चित्रपटाने सुरू झालं. यानंतर ती 'हाऊसफुल 3', 'द शौकीन्स', 'क्वीन', 'ए दिल है मुश्किल' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये लिसाने बॉयफ्रेंड दिनो लालवानी सोबत लग्न केलं. दोघं गाठ लग्नाआधी सुमारे एक वर्ष डेट करत होते.