Anant - Radhika Wedding LIVE: उरले काही क्षण! थोड्याच वेळात अनंत-राधिका अडकणार विवाहबंधनात

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट आज 12 जुलै रोजी सप्तपदी घेणार आहेत. या लग्नात फक्त भारतातील नाही तर परदेशातूनही अनेक पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. तर हा शाही विवाह सोहळा लग्न मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे होणार आहे. 

Anant - Radhika Wedding LIVE: उरले काही क्षण! थोड्याच वेळात अनंत-राधिका अडकणार विवाहबंधनात

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज 12 जुलै रोजी मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये सप्तपदी घेणार आहेत. मार्चपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती कारण त्यावेळी जामनगरमध्ये पहिल्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर इटलीमध्ये दुसरं प्री-वेडिंग झालं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नात कोण येणार? कधी हे लग्न होणार? त्यासोबत या लग्नाचा मुहूर्त काय असेल याची चर्चा रंगली आहे. 

12 Jul 2024, 09:31 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : अनंत- राधिकाच्या लग्नाचा मुहूर्त काय? आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांचं वेळापत्रक समोर

  • आज दुपारी 3 वाजता वरातीत जाणारे सगळे लोक एकत्र येतील आणि भेटा बांधण्याचा विधीची सुरुवात होईल. 
  • त्यानंतर मिलनीचा विधी होईल यात लग्नस्थळी नवरदेव आल्यानंतर नवरीचे जवळचे नातेवाईक त्याचे स्वागत करतात. त्यासोबत त्याला भेट म्हणून वस्तू देतात. 
  • रात्री 8 वाजता वरमाळाच्या विधीला सुरुवात होईल. 
  • लग्न, सप्तपदी आणि सिंदूर दान या सगळ्या विधी रात्री 9.30 वाजता पार पडतील. 
  • तर लग्नासाठी भारतीय पारंपारिक ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. 
  • 13 आणि 14 जुलै अशा दोन्ही दिवशी वेगवेगळ्या लोकांसाठी रिसेप्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
  • लग्नात आणि रिसेप्शन पार्टीत जगभारतील राजकारणी, उद्योगपती, स्पोर्ट्स क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार हजेरी लावतील. 

12 Jul 2024, 09:23 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : 'या' उद्योगपतींनी लावली हजेरी

रिपोर्ट्सनुसार, या लग्नात एचएसबीसी ग्रुपचे चेअरमेन मार्क टकर, अरामकोचे सीईओ अमीन नासर, मॉर्गन स्टेनलीचे एमडी मायकल ग्रिम्स, एडोबचे सीईओ शांतनु नारायण, मुबाडालाचे एमडी खलदून अल मुबारक, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमेन जे ली, लॉकहीड मार्टिनचे सीईओ जेम्स टॅक्लेट, बीपीचे सीईओ मरे औचिनक्लोस, टेमासेकचे सीईओ दिलहान पिल्ले आणि एरिक्सनचे सीईओ बोरजे एकहोम, एचपीचे अध्यक्ष एनरिक लोरेस, एडीआयए बोर्डचे सदस्य खलील मोहम्मद शरीफ फौलाथी, कुवेत गुंतवणूक प्राधिकरणाचे एमडी बदर मोहम्मद अल-साद, नोकियाचे अध्यक्ष टॉमी उइटो, ग्लॅक्सोस्मिथक्लाइनची सीईओ एम्मा वाल्म्सली, जीआयसीचे सीईओ लिम चाउ किआट आणि मोइलिस अ‍ॅन्ड कंपनीचे उपाध्यक्ष एरिक कॅंटर यांच्याशिवाय आणखी बरेच उद्योगपती यावेळी सहभागी असतील अशी चर्चा सुरु आहे. 

 

12 Jul 2024, 09:10 वाजता

Anant Ambani Radhika Merchang Wedding Live : किम कर्दाशियनशिवाय परदेशातून आले 'हे' पाहुणे

किम कर्दाशियनशिवाय अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यात बॉक्सर माइक टायसन, ब्रिटनचे माजी पंतप्रधान आणि बिझनेसमॅन बोरिस जॉनसन आणि टोनी ब्लेयर, अभिनेता जेफ कून्स, जय शेट्टी, अमेरिकेच माजी परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर, माजी स्वीडिश पंतप्रधान कार्ल बिल्डच, तंजानियाच्या राष्ट्रपती सामिया सुलूहू हसन आणि फीफाचे अध्यक्ष जियाननी इन्फेंटिनो देखील सहभागी होणार आहेत. 

12 Jul 2024, 09:03 वाजता

Anant Ambani Radhika Merchang Wedding Live : शाही विवाहासाठी प्रियांका पती निक जोनससोबत भारतात

प्रियांका काल पती निक जोनस आणि लेक मालतीसोबत मुंबईत अनंत आणि राधिकाच्या शाही विवाहासाठी आली आहे. तिचा विमानतळावरील व्हिडीओ समोर आल्यानंतर आता तिनं देखील निकसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. 

Anant Ambani Radhika Merchang Wedding Live priyanka chopra

 

12 Jul 2024, 08:54 वाजता

Anant Ambani Radhika Merchang Wedding Live : किम कार्दशियन भारतात दाखल...

लोकप्रिय हॉलिवूड सेलिब्रिटी किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो कर्दाशियन काल रात्री मुंबईत पोहोचले आहेत. गुरुवारी रात्री त्या दोघी कलीना विमानतळावर स्पॉट झाल्या. त्यांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.