Anant - Radhika Wedding LIVE: उरले काही क्षण! थोड्याच वेळात अनंत-राधिका अडकणार विवाहबंधनात

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट आज 12 जुलै रोजी सप्तपदी घेणार आहेत. या लग्नात फक्त भारतातील नाही तर परदेशातूनही अनेक पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. तर हा शाही विवाह सोहळा लग्न मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे होणार आहे. 

Anant - Radhika Wedding LIVE: उरले काही क्षण! थोड्याच वेळात अनंत-राधिका अडकणार विवाहबंधनात

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज 12 जुलै रोजी मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये सप्तपदी घेणार आहेत. मार्चपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती कारण त्यावेळी जामनगरमध्ये पहिल्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर इटलीमध्ये दुसरं प्री-वेडिंग झालं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नात कोण येणार? कधी हे लग्न होणार? त्यासोबत या लग्नाचा मुहूर्त काय असेल याची चर्चा रंगली आहे. 

12 Jul 2024, 16:52 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live :  विवाह स्थळी पोहोचलं अंबानी कुटुंब

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुकेश अंबानी, आकाश अंबानी त्यांची पत्नी श्लोका अंबानी आणि ईशा अंबानी आणि तिचा नवरा आनंद पिरमल हे पारंपारिक वेशात दिसले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 16:47 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: दुल्हेराजा जिओ वर्ल्ड सेंटरला रवाना

अँटिलिया ढोल आणि डान्स, फुलांनी सजलेल्या गाडीमधून अनंत अंबानी जिओ वर्ल्ड सेंटरकडे रवाना. 8 वाजता अनंत-राधिका अडकणार विवाहबंधनात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 15:47 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह 

अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने अक्षय अनंत-राधिका यांच्या लग्नाला जाणार नाही. गेल्या दोन दिवसांपासून अक्षयची तब्येत आहे खराब. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 15:35 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : अनंतची वरात अखेर निघाली...

संपूर्ण अंबानी कुटुंब हे अनंतची वरात घेऊन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जायला निघाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 13:09 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : किम कर्दाशियनसाठी मुंबईत आणली रिक्षा

अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो कर्दाशियन हे काल रात्री मुंबईत आले. काल अशी चर्चा होती की किम कर्दाशियनला मुंबई आल्यानंतर रिक्षा चालवायची आहे. तर आता किम कर्दाशियनसाठी चक्क मुंबईत रिक्षा आणली आहे. पण तिनं रिक्षा चालवली नाही तर तिनं आणि क्लोनं रिक्षाच्या सवारीचा आनंद घेतला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 11:43 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : 'काम डाऊन' फेम नायजेरियन रॅपर मुंबईत दाखल

नायजेरियन रॅपर आणि गायक रेमा हा अनंत अंबानी अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 11:42 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : हॉलिवूडमध्ये झळकणार अनंत आणि राधिकाचं लग्न

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो त्यांच्या The Kardashians या शोसाठी अनंत आणि राधिकाच्या लग्नाची एक डॉक्युमेंट्री बनवतील. त्यामुळेच किम आणि क्लो यांच्यासोबत त्यांचे हेअरस्टायलिस्ट आणि फिल्मिंग प्रोड्युसर देखील त्यांच्यासोबत मुंबईत आले आहेत. ते यावेळी त्यांचा मुंबईतील संपूर्ण प्रवास आणि अंबानींचं लग्न शूट करतील. तर येणाऱ्या 6 व्या सीझनमध्ये हे लग्न आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. 

12 Jul 2024, 11:06 वाजता

Anant Ambani Radhika Merchang Wedding Live : अनंत - राधिकाच्या लग्न सोहळ्यामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

12 ते 15 जुलै रोजी दुपारी 1:00 ते मध्यरात्रीपर्यंत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर प्रवेश प्रतिबंधित असणार आहे असं मुंबई वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

नक्की कोणते रस्ते बंद आहेत हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

12 Jul 2024, 10:51 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : अनंत आणि राधिकाच्या लग्ना सोहळ्यामुळे BKC मधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

मुंबईच्या BKC परिसरात असलेल्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये आज अनंत आणि राधिका सप्तपदी घेणार आहेत. तर यावेळी अनेक हायप्रोफाईल व्यक्ती या लग्न सोहळ्यात हजेरी लावणार असल्यानं रस्ते वाहतुकवर परिणाम होईल तर अशात BKC मध्ये असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आज वर्क फ्रॉम करण्याचा सल्ला दिला आहे. 
 

12 Jul 2024, 09:49 वाजता

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live : अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी भारतात परतला शाहरुख खान

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून न्युयॉर्कमध्ये लेक सुहानासोबत वेळ व्यथित करत होता. आता अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी तो मुंबईत परतला आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची सासू आणि गौरी खानची आई देखील दिसल्या.