Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या 'नाटू नाटू' चा ऑस्‍करमध्ये डंका, बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार

Oscars 2023 Academy Awards: ऑस्कर अकादमी पुरस्कार लवकरच सुरु होणार आहे. अशात भारतीयांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे. यंदा भारताला तीन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. त्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही अवॉर्ड प्रेझेंट करताना आपल्याला दिसणार आहे. 

Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या 'नाटू नाटू' चा ऑस्‍करमध्ये डंका, बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार

Oscars 2023 Academy Awards Live Updates: यंदाच्या वर्षीचं ऑस्कर अकादमी पुरस्कार 2023 आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. भारतीय तर ऑस्कर 2023 साठी प्रचंड उत्सुक आहेत. ऑस्कर अमेरिकेच्या लॉस एंजलिस येथे सुरु होणार आहे. भारतीयांसाठी यंदाचं वर्षे खूप खास आहे, कारण एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाच्या 'नाटु नाटु' या गाण्याला ऑरिजनल सॉन्ग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. तर त्यासोबतच 'ऑल दॅट ब्रीथ' या चित्रपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री कॅटेगरीत आणि 'द एलिफेंट विस्पर्स' या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्मसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. (Oscars 2023 Indian Films)  दरम्यान, यासोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यावेळी अवॉर्ड प्रेझेंट करतानाही आपल्याला दिसणार आहे. दीपिका आधी प्रियांका चोप्रानं 2016 (Priyanka Chopra) आणि 1980 मध्ये पर्सिस खंबाटानंतर आता अवॉर्ड प्रेझेंट करणारी दीपिका तिसरी भारतीय असणार आहे. चला तर जाणून घेऊया ऑस्करच्या लाइव्ह अपडेट्स... 

13 Mar 2023, 05:58 वाजता

Oscar 2023 : Ke Huy Quan ला मिळाला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर

Everything Everywhere All at Once साठी Ke Huy Quan ला बेस्ट सपोर्टिंग कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. 

13 Mar 2023, 05:50 वाजता

Oscar 2023 : Guillermo del Toro च्या Pinocchio​ ला मिळाला बेस्ट फिचर फिल्म पुरस्कार 

ड्वेन जॉन्सन आणि एमिली ब्लंट यांनी पहिला अवॉर्ड प्रेझेंट केला असून तो Best Animated Feature Film साठी Guillermo del Toro च्या Pinocchio देण्यात आला आहे. 

13 Mar 2023, 05:39 वाजता

Oscars 2023 :  Malala Yousafzai नं ऑस्कर सोहळ्यात अशी केली एन्ट्री 

मलाला ही एक सोशल अॅक्टिव्हिस्ट आहे. तिच्या या लूकनं सगळ्यांची मने जिंकली आहेत. व्होग मॅगझिननं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मलालाचा फोटो शेअर केला आहे. 

13 Mar 2023, 05:33 वाजता

RRR कलाकारांची ऑस्कर सोहळ्यात एन्ट्री 

दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरनं एन्ट्री केली आहे. राम चरणनं त्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. 

13 Mar 2023, 05:21 वाजता

Oscar 2023 Deepika Padukone : ऑस्करसाठी दीपिका तयार

यंदाच्या वर्षी ऑस्कर प्रेझेंट करणारी दीपिका एकमेव भारतीय आहे. दीपिका त्यासाठी रेडी झाली असून तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे हे फोटो शेअर केले आहेत. दीपिकानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती सुंदर दिसत आहे.