Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या 'नाटू नाटू' चा ऑस्‍करमध्ये डंका, बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार

Oscars 2023 Academy Awards: ऑस्कर अकादमी पुरस्कार लवकरच सुरु होणार आहे. अशात भारतीयांची उत्सुकता ही शिगेला पोहोचली आहे. यंदा भारताला तीन कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. त्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण ही अवॉर्ड प्रेझेंट करताना आपल्याला दिसणार आहे. 

Oscars 2023 : आरआरआर चित्रपटाच्या 'नाटू नाटू' चा ऑस्‍करमध्ये डंका, बेस्‍ट ओरिजनल गाण्याचा ऑस्‍कर पुरस्‍कार

Oscars 2023 Academy Awards Live Updates: यंदाच्या वर्षीचं ऑस्कर अकादमी पुरस्कार 2023 आपल्या सगळ्यांसाठी खास आहे. भारतीय तर ऑस्कर 2023 साठी प्रचंड उत्सुक आहेत. ऑस्कर अमेरिकेच्या लॉस एंजलिस येथे सुरु होणार आहे. भारतीयांसाठी यंदाचं वर्षे खूप खास आहे, कारण एस.एस. राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाच्या 'नाटु नाटु' या गाण्याला ऑरिजनल सॉन्ग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं आहे. तर त्यासोबतच 'ऑल दॅट ब्रीथ' या चित्रपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री कॅटेगरीत आणि 'द एलिफेंट विस्पर्स' या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्मसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. (Oscars 2023 Indian Films)  दरम्यान, यासोबतच अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यावेळी अवॉर्ड प्रेझेंट करतानाही आपल्याला दिसणार आहे. दीपिका आधी प्रियांका चोप्रानं 2016 (Priyanka Chopra) आणि 1980 मध्ये पर्सिस खंबाटानंतर आता अवॉर्ड प्रेझेंट करणारी दीपिका तिसरी भारतीय असणार आहे. चला तर जाणून घेऊया ऑस्करच्या लाइव्ह अपडेट्स... 

13 Mar 2023, 07:02 वाजता

Oscars 2023: ब्लॅक पॅन्थरला मिळाला बेस्ट कॉस्च्युम डिजाईनचा पुरस्कार
टब्लॅक पॅन्थर : वकांडा फॉरेव्हरटसाठी (Black Panther Wakanda Forever) बेस्ट कॉस्च्युम डिजाईनचा पुरस्कार रुथ कार्टरला मिळाला आहे. तिचा हा दुसरा पुरस्कार असून ती पहिली ब्लॅक वूमन आहे जिला एकापेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. 

13 Mar 2023, 07:00 वाजता

13 Mar 2023, 06:52 वाजता

Oscars 2023: Ram Charan ला करायचा 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स? 

13 Mar 2023, 06:47 वाजता

Oscars 2023: बेस्ट हेअर अ‍ॅंड मेकअप
'द व्हेल' (The Whale) या चित्रपटाला 95th ऑस्कर 2023 मध्ये बेस्ट हेअर अ‍ॅंड मेकअपचा पुरस्कार मिळाला आहे. 

13 Mar 2023, 06:40 वाजता

Oscar 2023 : RRR च्या नाटू नाटू गाण्यानं झाली होती सुरुवात 

जिमी किमेल स्टेजवर मोनोलॉग बोलत असताना नाटू-नाटूच्या डान्सर्स त्याला एस्कॉर्ट करत घेऊन गेले होते. हे पाहता तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हे देखील उत्साही झाले होते. 

13 Mar 2023, 06:30 वाजता

Oscars 2023: बेस्ट सिनेमॅटोग्राफी 
'ऑल क्वाइट ऑन द वेस्टर्न फ्रंट' (All Quiet on the Western Front) या हॉलिवूड चित्रपटाला बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. 

13 Mar 2023, 06:27 वाजता

Oscar 2023 : लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार

'आयरिश गुडबाय' (An Irish Goodbye) या चित्रपटानं या कॅटेगरीमध्ये मजल मारली आहे. 

13 Mar 2023, 06:24 वाजता

Oscar 2023 : बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर फिल्म
या कॅटेगरीमध्ये 'ऑल दॅट ब्रीथ' हा भारतीय चित्रपट देखील होता. मात्र, यंदाच्या वर्षी हा पुरस्कार नैवेल्नी (Navalny) ला मिळाला आहे. 

13 Mar 2023, 06:13 वाजता

Oscars 2023 : एमएम किरावानी यांची हजेरी
RRR या चित्रपाटातील नाटू नाटू गाण्याला संगीतबद्ध करणाऱ्या MM Keeravaani यांनी पत्नीसोबत ऑस्कर सोहळ्यात हजेरी लावली आहे. 

13 Mar 2023, 06:07 वाजता

Oscar 2023 : Jamie Lee Curtis ला Everything Everywhere All at Once साठी मिळाला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस पुरस्कार

एवरिथिंग एव्हरिवेअर ऑल अ‍ॅट वन्ससाठी आधी Ke Huy Quan ला बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. आता बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीचा पुरस्कार जेमी ली कर्टिसला मिळाला आहे.