गायक लकी अली कायद्याच्या कचाट्यात; पोलिसांकडे मागितला मदतीचा हात

गायक लकी अली यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेसमोर संपूर्ण प्रकरण मांडलं आहे. 

Updated: Dec 5, 2022, 05:21 PM IST
गायक लकी अली कायद्याच्या कचाट्यात; पोलिसांकडे मागितला मदतीचा हात

मुंबई : ऐकापेक्षा एक हिटवर हिट गाणी देणारे प्रसिद्ध गायक लकी अली या दिवसांत कठिण प्रसंगात आहेत. त्यांनी आपलं दुख: आपल्या चाहत्यांसोबत फेसबूकवर शेअर केलं आहे. असं म्हटलं जातंय की, ते पोलिसांची मदत मागण्यासाठी गेले होते. तक्रारदेखील केली होती. मात्र कारवाई झाली नाही. आता त्यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेसमोर संपूर्ण प्रकरण मांडलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बैंगलोरमध्ये त्यांची जमिनीवर कोणीतरी अवैध कब्जा केला आहे. आणि यावर त्यांना उपाय हवा आहे.

फेसबूकवर लकी अलीने सांगितलं की, तिच्या फार्ममध्ये काही लोकं जबरदस्तीने घुसले आहेत. कर्नाटकचे DGP यांना लेटर लिहून सांगितलं की, ''सर माझं नाव मकसूद महमूद अली आहे. मी दिवंगत एक्टर आणि कॉमेडियन महमूद अली यांचा मुलगा आहे. आणि लकी अली या नावाने ओळखला जातो. मी आता कामाच्या निमित्ताने दुबईमध्ये आहे. यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. नुकतंच माझ्या फार्ममध्ये जी एक ट्रस्ट प्रॉपर्टी आहे आणि केंचंनहल्ली येलहंकामध्ये या भागात आहे. यावर अवैध रितीने बैंगलोरच्या भू-माफिया सुधीर रेड्डी आणि मधु रेड्डीने कब्जा केला आहे. त्याची पत्नी जी IAS अधिकारी आहे आणि तिचं नाव रोहिणी सिंधूरी आहे. हे सगळं प्रकरण त्याने तिच्या मदतीने  केलं आहे. आपल्या फायद्यासाठी राज्याची सुविधांचा चुकिचा वापर करत आहे. ते लोकं जबरदस्ती माझ्या शेतात घुसले आणि महत्वाची कागदपत्र दाखवण्यास नकार दिला

लकी अली यांची पोलिंसाकडे धाव
लकी अली यांनी पुढे लिहीलं की, माझ्या वकिलांनी मला याबद्दल माहिती दिली होती. आणि सांगितलं की, हे पुर्णपणे अवैध आहे आणि त्यांच्याकडे फार्ममध्ये येण्यासाठी कोणतीच कोर्ट ऑर्डर नाहीये. आम्ही ईथे गेली ५० वर्ष राहत आहोत. मी दुबईवरुन येताच तुम्हाला भेटू ईच्छित होतो. आम्ही याची ACP कडे तक्रार दाखल केली आहे. मला अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. माझं कुटुंब आणि लहान मुलं शेतात एकटे आहेत. मला स्थानिक पोलिसांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. उलट ते कब्जा करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. सर, मी तुम्हाला विनंती करतो की ७ डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीपूर्वी हे बेकायदेशीर कृत्य थांबवा. कृपया आम्हाला न्याय द्या. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी हे प्रकरण पब्लिकसमोर घेवून आलो.  

लकी अलीच्या चाहत्यांनी साथ दिली
लकी अलीची ही पोस्ट समोर आल्यानंतर त्याच्या सर्व चाहत्यांनी त्याला सपोर्ट केला. तसंच गायकाला न्याय मिळावा अशी विनंती केली. या प्रकरणी काय कारवाई झाली हे अद्याप समजू शकलं नसलं तरी आता पोलिस त्यांच्या तक्रारीवर नक्कीच कारवाई करून प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा आहे.