...आणि चक्क पत्नी Kareena Kapoor ला विसरला Saif Ali Khan?

Saif Ali Khan आणि Kareena Kapoor नं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती, त्यावेळी हा संपर्ण प्रकार घडला आहे. 

Updated: Dec 5, 2022, 04:49 PM IST
...आणि चक्क पत्नी Kareena Kapoor ला विसरला Saif Ali Khan?

Saif Ali Khan and Kareena Kapoor Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेता करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्या दोघांचे लाखो चाहते आहेत. अलीकडेच, करीना आणि सैफ सौदी रेड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते आणि या दरम्यान, सैफनं मीडियाशी संवादही साधला. यावेळी सैफनं त्याच्या आवडत्या अभिनेत्रींची नावं सांगितली. मात्र, त्यात त्याची पत्नी करीनाचं नाव घेतलं नाही. 

कोण आहेत सैफच्या आवडत्या अभिनेत्री

रेड सी फेस्टिव्हलमध्ये रिपोर्ट्सनं सैफला त्याच्या आवडत्या अभिनेत्रींची कोण असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत सैफ म्हणाला, सुरुवातीच्या अभिनेत्रींची नाव घेतली नाही तर चित्रपटात काही नाही असं वाटेल आणि त्यानंतर सैफनं आपल्या आवडत्या अभिनेत्रींची नाव घेतली. मार्लेन डायट्रिच (Marlene Dietrich), ऑड्रे हेपबर्न (Audrey Hepburn) आणि चार्लीझ थेरॉन (Charlize Theron) या अभिनेत्रींची नाव घेतली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ त्याच्या आवडत्या अभिनेत्रींची नाव घेत होता तेव्हा तो त्याची पत्नी करीना कपूर खानचं नाव घेण्यास विसरला, तेव्हा त्याला करीनानं मध्येच थांबवलं आणि तिच्या नावाची आठवण करून दिली. त्यानंतर सैफ हसला आणि करीनाचं नाव घेतलं. (saif ali khan talk about his favorite actresses but forget wife kareena kapoor khan s name) 

हेही वाचा : Salman Khan ला स्टार करणाऱ्या निर्मात्याला हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर

पुढे सैफ त्याची आई शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची स्तुती करत म्हणाला की दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रॉय (Satyajit Ray) यांच्यासोबत अपु संसार चित्रपटात होती. त्यावेळी माझ्या आईचं वय हे 16 वर्षे आहे. यासोबत सैफ पुढे म्हणाला, संपूर्ण जगातून वेग-वेगळ्या स्त्रीया या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी आल्या आहेत आणि या गोष्टीला सेलिब्रेट करायला हवं की महिला आता सगळं काही सांभाळत आहेत आणि फक्त इंडियात नाही तर संपूर्ण जगात. करीना-सैफशिवाय या कार्यक्रमात शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अक्षय कुमारपासून (Akshay Kumar) अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.