एssss पलट; साडीत इतकं सुंदर कुणीच दिसलं नसेल, 'या' अभिनेत्रीला पाहून तुम्हीही असंच म्हणाल

साडीतील असंच एका महिलेचं सौंदर्य सध्या सोशल मीडियावर सर्वांना वेड लावत आहे. 

Updated: Jun 7, 2022, 08:49 AM IST
एssss पलट; साडीत इतकं सुंदर कुणीच दिसलं नसेल, 'या' अभिनेत्रीला पाहून तुम्हीही असंच म्हणाल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर बऱ्याचजणी जेव्हा त्यांचे साडीतील फोटो शेअर करतात तेव्हा '6 yards / 9 yards of elligance' असं कॅप्शन अनेकदा दिलं जातं. असं म्हणतात की, साडीतच स्त्रीचं खरं सौंदर्य खुलून येतं. आता हे सौंदर्य खुलून येणं म्हणजे नेमकं काय, हे तुम्हीच सांगू शकता. 

कारण, आपल्या आवडीची स्त्री/ महिला साडी नेसून जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा तिच्याकडे पाहतच रहावसं वाटतं. या एका वस्त्रानं सौंदर्यात पडणारी भर शब्दांतही मांडता येणार नाही, अशीच असते. 

साडीतील असंच एका महिलेचं सौंदर्य सध्या सोशल मीडियावर सर्वांना वेड लावत आहे. तिच्याकडे पाहिल्यानंतर हिच्याइतकं सुंदर साडीमध्ये कुणी दिसलंच नसेल, असंच अनेकजण म्हणत आहेत. 

पाठमोरी उभी असणारी ही आहे तरी कोण? असा प्रश्न मनात घर करत असतानाच पुढचाच फोटो, या सौंदर्यवतीचा खरा चेहरा समोर आणतो आणि तिथेच काळजाचा ठोका चुकतो. 

ही सौंदर्यवती आहे, अभिनेत्री शोभिता धुलीपाला. इन्स्टाग्रामवर आपल्या भन्नाट स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या शोभितानं नुकतेच काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती काळपट सोनेरी रंगाची एक साडी नेसून दिसत आहे. (made heaven actress sobhita dhulipala saree look is so stunning)

काळ्या रंगाचं स्लीव्हलेस, डीपनेक ब्लाऊस, गळ्यात हिऱ्यांचा हार, नजर भेदणारे डोळे आणि चेहऱ्यावर असणारी वेगळीच चमत असं तिचं सौंदर्य पाहणाऱ्यांना गारद करत आहे. 

'मेड इन हेवन' या सीरिजमधून शोभितानं खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळवली आणि पाहता पाहता अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ केलं. विविध चित्रपटांसोबतच ही अभिनेत्री वेब सीरिजमध्ये बरीच सक्रिय आहे.