अभिनेत्री मधुबाला यांच्यावर मुंबईचा त्यावेळचा हा डॉन फिदा होता, पण...

मधुबालाबद्दलचं वेड या डॉनला इतकं होते की, त्याला मधुबाला यांच्याशी लग्न करायचं होतं.

Updated: May 12, 2021, 10:28 PM IST
अभिनेत्री मधुबाला यांच्यावर मुंबईचा त्यावेळचा हा डॉन फिदा होता, पण...

मुंबई : हिंदी सिनेमातील सुंदर अभिनेत्री मधुबाला यांनी  २३ फेब्रुवारी १९६९ रोजी हृदयविकाराच्या कारणामुळे वयाच्या 36व्या वर्षी त्यांनी या जगाला निरोप दिला. आपण मधुबाला यांच्या बर्‍याच कथा ऐकल्या असतील, परंतु अंडरवर्ल्ड डॉन मधुबाला यांच्या प्रेमात होता या बद्दलची माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

तसं हे प्रख्यात आहे. बॉलिवूड अभिनेत्री अंडरवर्ल्ड डॉनच्या बऱ्याच वेळा प्रेमात पडतात आणि बर्‍याच वेळा डॉन देखील अभिनेत्रींच्या सौंदर्यावर फिदा होतात. पण आज आपण अंडरवर्ल्ड डॉनबद्दल बोलणार आहोत ज्याला मधुबाला यांच्यासोबत लग्न करायचं होतं. मधुबाला यांना मिळवण्यासाठी तो वाटेल तेवढा पैसा खर्चही करण्यास तयार होता. हा मुंबईचा सुप्रसिद्ध डॉन हाजी मस्तान होता.

हाजी मस्तानला मधुबाला खूप आवडत होत्या आणि तो त्यांच्यासाठी वेडा होता. मधुबालाबद्दलचं त्याचं वेड इतकं होते की, त्याला त्यांच्याशी लग्न करायचं होतं. दोघांमध्ये मैत्रीही होती, पण मधुबालावर प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच मधुबाला आजारी पडल्या. नंतर काही दिवसांतच त्यांचं निधन झालं.

मधुबालाच्या मृत्यूनंतर हाजी मस्तानला धक्का बसला. त्यांच्या मृत्यूनंतर सोना यांचं भविष्य खुलंल. सोना अगदी मधुबालासारख्या दिसत होत्या. जेव्हा सोनाची चित्रपटांमध्ये एन्ट्री झाली, तेव्हा जणू मधुबालाचं परतल्या आहेत असं सगळ्यांना वाटू लागलं होतं. त्या दोघांच्याही चेहऱ्यामध्ये, हसण्यामध्ये, बोलण्यामध्ये इतकं साम्य पाहून चित्रपटसृष्टीतील लोकही चकीत झाले. हाजीने सोनासाठी बरेच पैसे खर्च केले, पण त्यांचे चित्रपट चालू शकले नाहीत.

हाजी यांचं आधीच एक लग्न झालं होतं. पण त्या लग्नाचा हाजी आणि सोनाच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही. असं म्हटलं जातं की, हाजी मस्तानने कधीही कोणावर गोळीबार केला नाही, परंतु आपल्या स्टाईलने त्यांने दहशत निर्माण केली होती.

मधुबाला यांच्या बद्दल बोलायंचं झालं तर, त्यांच्या हृदयात फक्त छिद्र नव्हतं तर त्यांच्या फुफ्फुसातही समस्या होत्या .या व्यतिरिक्त त्यांना आणखी एक गंभीर आजार होता, ज्यामध्ये शरीरात आवश्यकते पेक्षा जास्त प्रमाणात रक्त तयार होऊ लागतं आणि ते रक्त नाक, तोंडाव्दारे बाहेर पडतं. मधुबाला त्यांच्या आजारपणामुळे नऊ वर्षे अंथरुणात होत्या. या आजारांना झुंज देत एक दिवशी त्यांनी या जगाला निरोप दिला.