मुंबई: अभिनेत्री माधुरी दिक्षित म्हणजे अनेकांसाठी एक गोड स्वप्नच जणू. आपल्या सुमधूर हास्य आणि तितक्याच दमदार अभिनयानं तिनं अनेकांचे हृदय जिंकले. तिच्या अभिनयातील कामगिरीला केवळ भारतच नव्हे तर, जगभरातून दाद मिळाली. पण, तिच्या अभिनयाचा हा खजिना मराठी प्रेक्षकांसाठी मात्र कधीच खुला झाला नाही. मराठमोळी असूनही तिचा एकही मराठी चित्रपट आतापर्यंत आला नाही. मात्र, अभिनय क्षेत्रात प्रदीर्घ काळ घालवल्यावर आता माधुरी 'बकेट लिस्ट' चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? याच धक धक गर्लचे दिल एके काळी एका क्रिकेटपटूसठी धडकत होते. होय, आम्ही बोलतोय भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाबद्धल.
एकेकाळी लाखो दिलों की धडकन असलेली माधूरी अजय जडेजावर फिदा होती. पण, अचानकपणे तिच्या जिवनात असे काही घडले की, तिचे जडेजासाठी धडकणारे दिल बंद झाले. खरे तर, डॉ. नेने यांच्यासोबत माधुरीचे लग्न होण्याआगोदर तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. पण, बॉलिवूड बाहेरच्या अजय जडेजासोबतही तिचे नाव जोडले गेले. अर्थात याला माधूरी किंवा जडेजा यांच्याकडून कधीही पुस्टी मिळाली नाही.
असे सांगितले जाते की, जडेजा एका श्रीमंत कुटुंबातला मुलगा होता. आणि माधुरी बॉलिवूडमधली आघाडीची नायीका. एका मासिकाच्या शुटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली. पुढे ही ओळख मैत्री आणि काहीशा जवळकीत बदलली. दरम्यान, अजय जडेजाचे नाव अजहरूद्दीनसोबत मॅच फिक्सिंगमध्ये आले आणि दोघांच्या नात्यात अंतर आले. अर्थात, खरे खोटे त्या दोघांनाच माहिती. पण, बॉलिवूडमध्ये असा गॉसिपची काहीच कमी नसते.