जॅकलिन या पिढीतील सर्वोकृष्ट अभिनेत्री- सलमान खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत काम केले.

Updated: May 22, 2018, 04:05 PM IST
जॅकलिन या पिढीतील सर्वोकृष्ट अभिनेत्री- सलमान खान title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. इतकंच नाही तर प्रत्येक पिढीतील अभिनेत्रींसोबत काम केले आहे. सध्या त्याच्या रेस ३ सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी रेस ३ ची टीम माधुरी दीक्षितच्या डान्स दिवाने या रियालिटी शो मध्ये पोहचली होती. यादरम्यान सलमानने केलेल्या एका विधानामुळे कतरिना कैफ, अनुष्का शर्मा या अभिनेत्री नाराज होऊ शकतात. रेस ३ मध्ये सलमान आणि जॅकलिनची जोडी पाहायला मिळणार आहे. शो मध्ये सलमान म्हणाला की, जॅकलिन या पिढीतील सर्वात उत्तम अभिनेत्री आहे. आता सलमानचे हे विधान इतर अभिनेत्रींना काहीसे दुखावू शकते.
शो च्या सुरुवातील सलमान-जॅकलिनने रेस ३ च्या गाण्यावर बहारदार परफॉर्मन्स दिला.

जॅकलिनला मध्येच थांबवत सलमान म्हणतो...

शो ची जज माधुरी दीक्षितने एक दो तीन या गाण्याच्या पूर्ननिर्मिती बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. तर हे गाणे करायला मिळणे ही तर देवाचीच कृपा अशा शब्दांत जॅकलिनने आपल्या भावना व्यक्त केल्या. तेव्हा सलमानने जॅकलिनला मध्येच रोखत ही या पिढीची सर्वोकृष्ठ अभिनेत्री आहे. सध्याच्या पिढीत जॅकलिनपेक्षा उत्तम कोणीच नाही, असे म्हटले. सलमान-जॅकलिनने यापूर्वी किक सिनेमात एकत्र काम केले होते. हा दोघांचा एकत्र असा दुसरा सिनेमा आहे.

सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर

या सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करत आहेत. तर सलमान-जॅकलिनशिवाय या सिनेमात बॉबी देओल, डेझी शहा, अनिल कपूर आणि साकीब सलीम यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १५ जूनला प्रदर्शित होईल.