माधुरी दीक्षितमुळे माझ्या बहिणीचा संसार मोडला', जेव्हा अभिनेत्रीवर बरसली संजय दत्तची मेहुणी

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दोघांनी 'खलनायक' आणि 'साजन'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. एकत्र काम करत असताना माधुरी आणि संजय दत्त यांच्यात जवळीक वाढली. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा चित्रपटसृष्टीत रंगल्या. 

Updated: Sep 1, 2023, 07:40 PM IST
माधुरी दीक्षितमुळे माझ्या बहिणीचा संसार मोडला', जेव्हा अभिनेत्रीवर बरसली संजय दत्तची मेहुणी title=

मुंबई : संजय दत्त आणि त्याची पत्नी रिचा शर्मा ही जोडी एकेकाळची सगळ्यात प्रसिद्ध जोडी होती. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नव्हतं. रिचा शर्माने संजय दत्तसोबतचं लग्न वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ती त्याला वाचवू शकली नाही आणि शेवटी दोघंही वेगळे झाले. संजय दत्त आणि ऋचा शर्मा यांनी माधुरी दीक्षितला त्यांचं लग्न तुटण्यामागचं कारण मानलं होतं. त्यामुळे लोकं माधुरी दीक्षितला 'होम ब्रेकर' म्हणू लागले. अगदी संजय दत्तच्या मेहुणेनीही माधुरी दीक्षितवर प्रचंड संताप व्यक्त केला होता.

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दोघांनी 'खलनायक' आणि 'साजन'सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. एकत्र काम करत असताना माधुरी आणि संजय दत्त यांच्यात जवळीक वाढली. दोघांच्या प्रेमाच्या चर्चा चित्रपटसृष्टीत रंगल्या. संजय दत्तने नंतर अनेक मुलाखतींमध्ये माधुरी दीक्षितसोबत संबंध असल्याचा बातम्यांवर नकारही दिला होता.  पण पत्नी रिचा शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की माधुरीने फसवणूक केल्यामुळे संजय दत्त कशाप्रकारे तुटला होता.   
 
संजय दत्त आणि माधुरीचं प्रेम आणि त्याची ठिणगी
नव्वदच्या दशकात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित हे इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते. या दोघांनी चित्रपटाच्या पडद्यावर तसेच वास्तविक जीवनातही धुमाकूळ घातला होता. 1991 मध्ये 'साजन' रिलीज झाल्यानंतर माधुरी दीक्षित आणि संजय दत्तच्या अफेअरच्या चर्चा सर्वांच्याच ओठावर होत्या.  माधुरी दीक्षितला संजय दत्तची खूप आवड होती  वृत्तानुसार, माधुरी दीक्षितने अनेक मुलाखतींमध्ये संजय दत्तला तिचा 'आवडता सहकलाकार' म्हणूनही सांगितलं होतं. अशाच चर्चांमुळे त्यांच्या प्रेमाच्या ठिणगी पेटल्या होत्या, ज्याची ज्योत रिचा शर्मालाही जाणवू लागली होती.

रिचा शर्मा देखील एक अभिनेत्री होती. तिने 80 च्या दशकात काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं आणि त्यानंतर संजय दत्तसोबत लग्न केले. संजय दत्तने 1987 मध्ये रिचा शर्मासोबत लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षानंतर संजयचं माधुरी दीक्षितसोबत अफेअर सुरू झालं.  संजय दत्तला ऋचा शर्मापासून एक मुलगी आहे जिचं नाव त्रिशाला दत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, संजय दत्त विवाहित असूनही माधुरीसोबत लग्न करू इच्छित होता. संजय दत्त आणि माधुरी प्रेमात वेडे होते हे इंडस्ट्रीतल्या सगळ्यांनाच माहीत होतं. माधुरीसाठी संजय दत्त पत्नी रिचाला घटस्फोट देणार असल्याचीही चर्चा होती. आणि तसं झालं सुद्धा. रिचा शर्मा कर्करोगाने त्रस्त होत्या. तिला ब्रेन ट्यूमर झाला होता, त्यासाठी ती अमेरिकेत उपचारासाठी होती. त्याचवेळी संजय दत्तचे माधुरी दीक्षितवरील प्रेम वाढत होतं. पती संजय दत्तचे माधुरी दीक्षितसोबत अफेअर असल्याची बातमी ऋचाच्या कानावर गेल्यावर तिने उपचार अर्धवट सोडून ती मुंबईत परतली.

यावेळी ऋचा शर्मा म्हणाली, 'मी संजय दत्तवर मनापासून प्रेम करते. मी सदैव त्याच्या पाठीशी उभा राहीली. पण जेव्हा मी त्याला भारतात भेटायला आले तेव्हा त्याने माझ्याशी अतिशय वाईट वर्तन केलं. काही वर्षांनी 1996 मध्ये रिचा शर्माचं निधन झालं. रिचा शर्माची बहीण आना शर्माने तर माधुरी दीक्षितला 'घर तोड़ने वाली' म्हटलं होतं. 1992 मध्ये सिनेब्लिट्ज मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ऋचाच्या बहिणीने माधुरी दीक्षितला फटकारलं आणि तिला अजिबात माणुसकी नसल्याचं सांगितलं. माधुरीची इच्छा असती तर तिला कोणताही पुरुष सापडला असता.