माधुरीच्या मनाचं सौंदर्य ही मोठं, टेलिव्हिजन अभिनेत्रीला लाखोंची मदत

हिंदी टेलिव्हिजन विश्वात कित्येक वर्ष काम करुन देखील एका अभिनेत्रीला आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 

Updated: Jul 13, 2021, 11:11 PM IST
माधुरीच्या मनाचं सौंदर्य ही मोठं,  टेलिव्हिजन अभिनेत्रीला लाखोंची मदत

मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वात कित्येक वर्ष काम करुन देखील एका अभिनेत्रीला आता आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. स्वत:च्या आजरपणामुळे होणारा खर्च या अभिनेत्रीला उचलणं कठीण झालं आहे. हिंदीच्या स्मॉल स्क्रीनवर झळकलेल्या या अभिनेत्रीकडे गेली 4 वर्ष काम नाही. शगुफ्ता अली असं या अभिनेत्रीचं नावं आहे.

अभिनेत्री शगुफ्ता अली त्यांच्या आजारापणाबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणाने रिआलिटी शोमध्ये बोलल्या आहेत. 'डांस दिवाने 3' च्या मंचावर नुकतीच शगुफ्ता गुप्ता यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्याची परिस्थिती पाहून धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने पुढाकार घेत त्यांना मदत केली.सौर्द्यांमुळे चर्चेत असणाऱ्या माधुरी दीक्षितचं मनाचं सौर्द्य यावेळी पाहायला मिळाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

 शुगफ्ता अली यांनी सांगितलं, की त्या डायबिटिजवर उपचार घेत आहे. आणि सध्या हातात कोणतंच काम नसल्याने त्यांना उदरर्निवाहासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो आहे. नुकतीच शगुफ्ता यांनी डांस दिवानेच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती बघता माधुरीने 5 लाखांची मदत त्यांना केली आहे.

याआधी शुगफ्ता यांनी त्यांच्या आईच्या आजारापणासाठी आणि स्वत:च्या मेडिकल खर्चांसाठी सोशल मीडियाद्वारे मदतीची मागणी केली होती. यावेळी अनेकांनी शुगफ्ता यांना मदतीचा हात दिला होता. या मंचावर शगुफ्ता यांनी आपल्यावर ओढावलेली परिस्थिती आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी केलेली धडपड यावर बोलत सगळ्यांचे आभार मानले.