धकधक गर्ल माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर प्रदर्शीत

 स्वत: माधुरीने हा टीजर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअरही केला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 25, 2018, 11:31 PM IST
धकधक गर्ल माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा टीझर प्रदर्शीत title=

मुंबई : गेली अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये दमदार कामगिरी करणारी मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या पहिल्यावहिल्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मराठमोळी असूनही माधुरीने मराठी चित्रपटात काम का केले नाही, याबाबत माधुरीच्या चाहत्यांसोबत अनेकांना उत्सुकता होती. पण, आता ही उत्सुकता संपली असून, माधूरी 'बकेट लिस्ट' नावाच्या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच 'बकेट लिस्ट'चा टीजरही प्रदर्शीत झाला. स्वत: माधुरीने हा टीजर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअरही केला आहे.

दरम्यान, संक्रांतीच्या दिवशी या चित्रत्रपटाचे पोसल्टर लॉन्च करून माधुरीने अनेकांची संक्रांत तिळगूळापेक्षाही गोड करून टाकली होती. आता तर चित्रपटाचे टीजरही लॉन्च झाले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता आहरे ती चित्रपटाची. अर्थात, चित्रपटातील गाणी अद्याप यायची आहेत. पण, तोपर्यंत तरी टीजरवरच समाधान मानावे लागणार आहे.

दरम्यान, 'बकेट लिस्ट' हा आपल्या आस्तित्वाचा शोध घेणाऱ्या एका सामान्य, मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी असल्याचे सांगितले जात आहे. मध्यवमर्गीय स्त्रीची कहणी सांगणारे तसे बरेचसे चित्रपट मराठीत आले आहेत. पण, आपल्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटातून माधूरी काय देणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.