तुझ्यात जीव रंगला : वहिनीसाहेब परत येतायत....

 नंदिता परत येतेय, नवा ट्विस्ट घेऊन

Updated: Oct 26, 2020, 03:42 PM IST
तुझ्यात जीव रंगला : वहिनीसाहेब परत येतायत....

मुंबई : ४ वर्ष आणि १२०० एपिसोडचा टप्पा पूर्ण करताना 'तुझ्यात जीव रंगला' मालिका लोकप्रिय होत आहे. असं असताना नंदिता वहिनी परत येतेय... नवं वळणं घेऊन....

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे.

४ वर्ष आणि १२०० एपिसोडचा टप्पा पूर्ण करताना नंदिता परत येतेय, नवा ट्विस्ट घेऊन! कटकारस्थान, फसवेगिरी या सगळ्यात शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वाहिनी म्हणजेच आपल्या वाहिनीसाहेब यांची मालिकेत पुन्हा एन्ट्री होतेय, सोबत सुरज पण असणार आहे. आता ह्या दोघांना राणा दा आणि गोदाक्का घरात घेतील का ? नंदिताच्या अरेरावी स्वभावाला जिजा कसा उत्तर देईल, हे येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

नंदिताच्या भूमिकेत ‘माधुरी पवार’ असणार आहे. माधुरी नंदिताची भूमिका साकारणार आहे. नंदिता हे पात्र धनश्री कडगावकर साकारत होती. मात्र आता धनश्री गरोदर असल्याचं समजतं. धनश्री काही दिवसांपूर्वी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.