Maharashtrachi Hasyajatra Off Air : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम जेव्हापासून सुरु झाला आहे तेव्हा पासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या शोचे अनेक एपिसोड हे प्रेक्षक पुन्हा पुन्हा पाहतात. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. हा शो सतत सुरु रहावा असं नेहमीच प्रेक्षकांना वाटतं. मात्र, आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. त्याचं कारण म्हणजे हा शो मोठा ब्रेक घेणार असल्याचं समोर आलं आहे. या शोमधील कलाकारांनी पोस्ट शेअर करत याविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हास्यजत्रेला निरोप देत असल्याचं सांगितलं आहे. नेमकं काय झालं आहे? हा शो का बंद होतोय याचं कारण देखील समोर आलं आहे. नम्रता संभेराव, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब आणि रसिका वेंगुर्लेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली आहे. त्या सगळ्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या सेटवरून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी see you soon असे कॅप्शन दिलं आहे. प्रियदर्शनीनं वनिता खरातचा एक फोटो शेअर करत शेवटचं शेड्यूल्ड असं कॅप्शन दिलं. तिनं आणखी दुसरा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं की प्रिय, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'... खूप आठवण येईल. बाय, बाय...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ची टीम आता दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्या अमेरिका टूरला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. त्यानिमित्तानं सगळे कलाकार हे या टूरवर असतील. तर ही टूर 19 सप्टेंबर सुरु होणार असून 26 ऑक्टोबरला संपणार आहे. यामुळे आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम काही काळासाठी बंद होणार आहे.
कोविड काळापासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. या मालिकेनं या कठीण काळात प्रेक्षकांना खूप हसवलं. हा कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांमध्ये एक उत्साह आणतो आणि अशात आता हा कार्यक्रम ब्रेक घेणार आहे हे पाहता प्रेक्षकांना दु:ख झालं आहे.
MAW
(20 ov) 109/9
|
VS |
BRN
111/3(14.4 ov)
|
Bahrain beat Malawi by 7 wickets | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 135/9
|
VS |
GER
137/6(18 ov)
|
Germany beat Tanzania by 4 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(20 ov) 207/2
|
VS |
GER
161/8(20 ov)
|
Bahrain beat Germany by 46 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.