कँन्सरवर मात केल्यानंतर महिमा चौधरीचा नवा लूक समोर; फोटो व्हायरल

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कँन्सरशी झुंज देत होती. 

Updated: Jun 12, 2022, 11:20 PM IST
कँन्सरवर मात केल्यानंतर महिमा चौधरीचा नवा लूक समोर; फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री महिमा चौधरी ब्रेस्ट कँन्सरशी झुंज देत होती. आता ती कॅन्सरशी लढाई जिंकून कॅन्सरमुक्त झाली आहे. खरंतर, अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या तब्येतीशी संबंधित एक मोठा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. महिमाने सांगितलं होतं की, तिला ब्रेस्ट कँन्सर आहे. या धोकादायक आजाराने महिमाचं संपूर्ण आयुष्य बदललं होतं. मात्र, आता अभिनेत्री या आजारातून पूर्णपणे मुक्त झाली आहे.

महिमा चौधरीने कॅन्सरशी लढाई जिंकली आहे
महिमाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने रडत आपल्या कॅन्सरच्या प्रवासाबद्दल सांगितलं होतं. दरम्यान, आता अभिनेत्रीने तिचा आणखी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये महिमा खूप बदलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती अनुपम खेर यांच्यासोबत हसत-हसत फोटोशूट करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्रीने एक सुंदर फोटोशूट केलं आहे
व्हिडिओच्या सुरुवातीला महिमाने तिच्या लांब केसांचा विग घातलेला दिसत आहे. त्यानंतर ती लहान केसांच्या लूकमध्ये दिसत आहे. डोळ्यात पाणी, चेहऱ्यावर हसू घेऊन महिमा चौधरी अनुपम खेर यांच्यासोबत फोटोशूट करून घेत आहे.