मुंबई : गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट्स आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक नव वळण!
प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत पाहिलं की राधिका गुरुनाथवर बिझनेसमध्ये देखील मात करत आहे. ए.एल.एफ. कंपनीला उतरती कळा लागली असताना गुरुनाथ राधिकाकडे नाईलाजाने मदतीसाठी धावतो. राधिका गुरूला फक्त मदत करण्यासाठी नाकारत नाही तर त्याला डिव्होर्स घेण्याची धमकी देखील देते. झालेल्या अपमानामुळे पेटलेला गुरु घटस्फोट घेण्यासाठी वकिलाकडे जातो. देसाई वकील सांगतात की सर्व पुरावे आणि आई वडील राधिकाच्या बाजूने असल्यामुळे राधिका तुमच्यावर केस करू शकते. यामुळे गुरु टेन्शनमध्ये येतो. आईकडून सिम्पथी मिळवण्यासाठी गुरु शनयाच्या मदतीने आईला फोन करतो.
परंतु आई जास्त काही न बोलता फोन ठेवून देते. राधिकाचा डिव्होर्स घेण्याच्या निर्णयाने आई मात्र निराश आहेत. राधिका गुरुनाथला डिव्होर्सच्या निमित्ताने कोर्टाच्या चक्कर कशा मारायला लावते आणि गुरुनाथचा बदला घेण्यासाठी राधिका त्याला ऑफिसची टेबल्स पुसायला लावेल का? हे पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल आणि हे प्रेक्षक पाहू शकतात रविवारी २९ जुलैला २ तासाच्या विशेष भागात. माझ्या नवऱ्याची बायको रविवार २९ जुलैला संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठी!!!