'मला अर्जुनच्या घरी जायचंय....' मलायका अरोरा बनली नवरी, व्हिडिओमुळे एकच चर्चा

 ज्यामध्ये ती लाल आणि चंदेरी रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. 

Updated: Feb 18, 2022, 03:56 PM IST
 'मला अर्जुनच्या घरी जायचंय....' मलायका अरोरा बनली नवरी, व्हिडिओमुळे एकच चर्चा title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये 'मुन्नी बदनाम' आणि 'ओढं रसीले' अशा आयटम नंबर्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री मलायका अरोराचा प्रत्येक अंदाज हा लक्षवेधून घेणारा ठरतो. योगा, हॉट फोटोशूट आणि फॅशन सेन्समुळे अभिनेत्री अनेकदा चर्चेत असते. त्याचवेळी मलायकाने आता ब्रायडल फोटोशूट केलं. 

मलायका अरोराने फोटोशूटचा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. ज्यामध्ये ती लाल आणि चंदेरी रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. 

यादरम्यान मलायकाने गोल्डन आयशॅडो, न्यूड ब्राऊन लिपस्टिक, गोल्डन बांगड्या आणि मॅचिंग हेवी मांगटिका देखील लावला आहे. 

मलायका अरोराचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.मलायकाला नवीन नवरीच्या लूकमध्ये पाहून चाहत्यांनी अर्जून कपूरची आठवण काढली आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की,'मला अर्जुनच्या घरी जायचं आहे.'

अनेक प्रतिक्रिया तिला या व्हिडिओवर येत आहेत. खरं तर हा व्हिडिओ खूपच जुना असून सध्या व्हायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चांगलीच चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत वेळ घालवताना आणि फोटो शेअर करताना दिसते.