'कठोर असलं तरी माझ्यासाठी तेच सर्वकाही...', मलायकाच्या व्हिडीओमुळे एकच खळबळ

मलायकाच्या आयुष्यात 'ही' गोष्ट सर्वात खास, म्हणते 'कठोर असलं तरी माझ्यासाठी तेच सर्वकाही...'  

Updated: Jun 21, 2022, 08:55 AM IST
'कठोर असलं तरी माझ्यासाठी तेच सर्वकाही...', मलायकाच्या व्हिडीओमुळे एकच खळबळ title=

मुंबई :  अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या डान्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. डान्स आणि फिटनेसनंतर  मलायकाच्या चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेलं अभिनेत्रीचं नातं. पण आता मलायका अर्जुनमुळे नाही सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिच्या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केली आहे. मलायकाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री योग करताना दिसत आहे. 

योग करताना व्हिडीओ पोस्ट करत मलायकाने कॅप्शनमध्ये, 'योग सर्वकाही असलं, तरी कठोर आहे. म्हणूनच मला डायनामिक पोजमध्ये योगचा सराव करायला आवडतं.' सध्या मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

मलायकाच्या व्हिडीओवर कमेंट करत सीमा सजदेह म्हणाली, 'मी शवासन करताना दाखवू शकते...?', मलायकाच्या व्हिडीओवर सीमाने केलेली कमेंट चर्चेत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे सीमा सजदेह?
सीमा सजदेह ही अभिनेता सोहेल खानची पहिली पत्नी आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. दोघेही बऱ्याच दिवसांपासून वेगळे राहत आहेत. 

दरम्यान, मलाकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती चाहत्यांना योगा करण्यास प्रवृत्त करण्याव्यतिरिक्त सुट्टीचा आनंद घेत आहे. मलायका इन्स्टाग्रामवर तिचे सुट्ट्यांचे फोटोही शेअर करत आहे.