मुंबई : मलायका अरोराचा फॅशनसेन्स खूप लोकप्रिय आहे. ती अनेकदा नवनवीन लूक करण्याचा प्रयत्न करत असते. पण असे काही लोक आहेत जे तिच्या आउटफिटवर सतत टीका करतात आणि तिला ट्रोल करु लागतात. आता मलायकाने यावर मौन सोडलं आहे. ती म्हणाली की, महिलांना डिपनेक आणि स्कर्टची लांबी यावर जज केलं जातं जे योग्य नाही. प्रत्येकाला त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे.
स्कर्टच्या लांबीवरुन केलं जातं जज
मलायका अरोरा दिलेल्या मुलाखतीदरम्यान म्हणाली की, ती मूर्ख नाही आणि तिला चांगलंच माहित आहे की, तिच्यावर काय चांगलं दिसतं आणि काही नाही. तिने सांगितलं की, तिच्या कपड्यांबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात जे पूर्णपणे चुकीचे आहेत. ती पुढे म्हणाली, स्त्रीला नेहमी तिच्या स्कर्टची लांबी आणि नेकलाइनची खोलगटपणावरून जज केलं जातं. मी माझं आयुष्य लोकांनुसार जगू शकत नाही. ड्रेसिंग ही वैयक्तिक निवड आहे ज्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
मी जजमेंट सिटवर बसली नाहीये
ती पुढे म्हणाली, तुमची एक विशिष्ट मानसिकता असू शकते परंतु ती माझ्यासाठी नाही. मी कोणालाही ड्रेससाठी विचारू शकत नाही आणि मला कोणी विचारू शकत नाही. मी जजच्या सिटवर बसले नाही लोकांना सांगण्यासाठी, अरे, तू असे कपडे का घालतात.
मला माहित आहे की, मला काय योग्य आहे आणि काय अयोग्य. पण ही माझी निवड आहे. मी काय घालावं हे सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही. जर मी माझे कपडे, शरीर, त्वचा आणि माझे वय या सर्व बाबतीत सोयीस्कर आहे. तर तुम्हीही तुमच्या मर्यादेत राहावं.