मलायका अरोरा आहे इतक्या कोटींची मालकीण, संपत्ती ऐकून बसेल धक्का

बॉलिवूड जगतात दहशत निर्माण करणारी अभिनेत्री मलायका अरोराला कोणत्याही ओळखीची गरज नाही. 

Updated: Sep 27, 2021, 05:53 PM IST
मलायका अरोरा आहे इतक्या कोटींची मालकीण, संपत्ती ऐकून बसेल धक्का

मुंबई : आपल्या डान्सची शैली, तिचा फिटनेस आणि तिचा बोल्ड अवतार यामुळे बॉलिवूड जगतात दहशत निर्माण करणारी अभिनेत्री मलायका अरोराला कोणत्याही ओळखीची गरज नाही. छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यांमध्ये आपल्या डान्सने खळबळ माजवणारी मलायका सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मलायकाने तिचं मॉडेलिंग करियर सुरुवात केली 

वयाच्या 47 व्या वर्षी मलायकाने स्वतःला पूर्णपणे फिट आणि मेंटेन केलं आहे. मलायका आज शाही लाईफस्टाईल जगते. रिपोर्ट्सनुसार मलायकाकडे एकूण 73-75 कोटींची संपत्ती आहे. 2021 मध्ये तिची एकूण संपत्ती 10 दशलक्ष डॉलर्स असल्याचं सांगितलं जातं.

मलायका चित्रपटांमध्ये आयटम साँग्सवर डान्स करण्यासाठी सुमारे 1.75 कोटी रुपये घेते. एवढंच नाही तर मलायका नच बलिये, नच बलिये सीझन 2, जरा नचके दिखा, झलक दिखला जा यांसारख्या रिअॅलिटी शोचा भाग म्हणून खूप मोठी रक्कम घेते.

रिपोर्ट्सनुसार मलायका एका महिन्यात 60 लाखांपेक्षा जास्त कमावते. एका एपिसोडसाठी 5 लाख आणि एका हंगामासाठी मलायका 1 कोटी रुपये घेते. याशिवाय, अभिनेत्री मुंबईत एक योग स्टुडिओ 'दिवा योग' देखील चालवते जिथून ती भरपूर कमावते.

मलायकाचे मुंबईतील वांद्रे परिसरात एक आलिशान घर आहे ज्याची किंमत कोट्यवधी आहे. तसंच, मुंबईच्या इतर अनेक भागातही तिची मालमत्ता आणि घरे आहेत. मलायका अरोरा महागडी आणि शाही गाड्यांचीही खूप आवड आहे. तिच्याकडे Range Rover Vogue, BMW 7 Series 730Ld, Toyota Innova Crysta, BMW X7 अशा अनेक गाड्या आहेत. मलायकाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये 30 पेक्षा जास्त ब्रँड एंडोर्समेंट्स देखील समाविष्ट आहेत.