Malaika Arora लवकरचं चाहत्यांना देणार खास गिफ्ट; काही तरी 'तुफानी' करण्याच्या विचारात

काय आहे मलायकाचं चाहत्यांसाठी खास गिफ्ट?

Updated: Jul 25, 2021, 09:46 AM IST
Malaika Arora लवकरचं चाहत्यांना देणार खास गिफ्ट; काही तरी 'तुफानी' करण्याच्या विचारात

मुंबई : आयुष्यात प्रत्येक जण काही तरी नवं करण्याच्या विचारात असतो.  तर काही विचार सत्यात उतरवण्याच्या प्रयत्नात करतात. आता अभिनेत्री मलायका अरोरा देखील काही तरी तुफानी करण्याच्या तयारीत आहे. याची माहिती मलायकाने एका मुलाखतीत दिली आहे. मलायका तिच्या टिमसोबत नव्या कंटेन्टची  निर्मिती करण्यााच्या विचारात आहे. ज्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. 

मलायका म्हणाली, 'अखेर एका शोची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. आशा करते की सर्व काही योग्य रित्या पार पडेल. असंख्य काम अद्यापही पाईपलाईनमध्ये आहेत. गेल्या 2 वर्षांपासून योजना पुढे सरकत आहेत. या प्रोजेक्टमध्ये मी खास सहकार्यांसह काम करत आहे.'

याशिवाय मलायका लवकरचं एक ऍप देखील लाँच करणार आहे. 'एक डान्स शो देखील लवकरचं सुरूवात होणार आहे आणि त्यासाठी मी आता प्रतीक्षा करू शकत नाही. आम्ही ऑनलाईन ऑडिशन घेण्यास सुरूवात केली आहे. मी माझं ऍप देखील लवकरचं सुरू करणार आहे.'

मलायका पुढे म्हणाली, 'मी माझ्या ऍपवर सध्या काम करत आहे. माझं जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा आहे. या ऍपच्या माध्यमातून युझर्स त्यांच्या आरोग्याबाबत संपर्क देखील करू शकतात.' आता मलायकाच्या नवं काम चाहत्यांना आवडता की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरलं आहे. 

मलायका बद्दल सांगायचं झालं तर, ती तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा देखील केला आहे. आता मलायका आणि अर्जुनचे चाहते आता  त्यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. पण लग्नाबद्दल मलायका आणि अर्जुनने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.