सिनेविश्वाला आणखी एक मोठा धक्का; 68 वर्षीय अभिनेत्याचं निधन

कवाविश्वाला मोठा धक्का...  250 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या प्रसिद्ध अभित्याने वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास   

Updated: Dec 4, 2022, 08:26 AM IST
सिनेविश्वाला आणखी एक मोठा धक्का; 68 वर्षीय अभिनेत्याचं निधन  title=

Kochu Preman Death : झगमगत्या विश्वातून चाहत्यांना निराश करणारी एक वाईट बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कोचू प्रेमन यांच निधन झालं आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (kochu preman death) कोचू प्रेमन यांच्या  निधनांमुळे सेलिब्रिटी आणि चाहत्याच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून  कोचू प्रेमन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनाने सिनेविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे... असं म्हणायला हरकत नाही. (kochu preman age)

मिळालेल्या माहितीनुसार,  कोचू प्रेमन यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. एवढंच नाही तर श्वास घेताना त्रास होत असल्यामुळे  कोचू प्रेमन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोचू प्रेमन यांच्या निधनानंतर कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (kochu preman old pictures)

प्रसिद्ध अभिनेत्यांच्या निधनाची माहिती (kochu preman family) कुटुंबाने दिली. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, कोचू प्रेमन यांच्यावर फुफ्फुसाच्या आजारावर उपचार सुरू होते. पण त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली. कोचू प्रेमन यांनी वयाच्या 68 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

कोचू प्रेमन मल्याळम चित्रपट आणि थिएटरमधील एक प्रसिद्ध अभिनेता होते. अनोख्या शैलीसाठी आणि चेहऱ्यावरील हावभावांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रेमान यांनी आपल्या अभिनयाने आणि विनोद बुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. (kochu preman son)
 
कोचू प्रेमन यांनी जवळपास 250 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. (kochu preman movies) कोचू प्रेमन यांनी 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एढू निरंगल' या सिनेमाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं.