फेसबुकच्या माध्यमातून अभिनेता म्हणाला Just Got Married, अन्....

पाहा त्याने पोस्ट केलेला फोटो 

Updated: Apr 10, 2019, 11:23 PM IST
फेसबुकच्या माध्यमातून अभिनेता म्हणाला Just Got Married, अन्....
प्रतिकात्मक छायाचित्र

तिरुवअनंतपूरम : सेलिब्रिटींच्या सोशल मीडियावर नेमक्या काय आणि कोणत्या प्रकारच्या पोस्ट केल्या जातात याकडे चाहत्यांचं चांगलच लक्ष असतं. अशाच एका सेलिब्रिटीचं सोशल मीडिया अकाऊंट सध्या प्रचंड चर्तेत आहे. अर्थात त्यामागचं कारणंही तसंच आहे. कारण, या अभिनेत्याने अतिशय अनपेक्षित पण, तितकीच आनंददायी पोस्ट करत चाहत्यांनाच नव्हे तर इतर कलाकारांनाही धक्काच दिला आहे. ही पोस्ट आहे त्या अभिनेत्याच्या लग्नाविषयीची. 

मल्याळम अभिनेता सनी वायने याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन 'जस्ट गॉट मॅरिड', असं कॅप्शन लिहित पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला. 'जून' या चित्रपटासाठी एकिकडे प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरणाऱ्या या अभिनेत्याच्या आयुष्यात आलेलं हे वळण पाहून त्याच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. 

बुधवारी सकाळी सनीने केरळमधील गुरुवायूर येथे लग्नगाठ बांधल्याचं वृत्त द न्यूज मिनिटने प्रसिद्ध केलं. कोची येथे असणाऱ्या क्षेत्र डान्स स्कूलच्या संस्थापकपदी असणाऱ्या आणि मुळच्या कोझिकोड़े येथील असणाऱ्या रेंजिनी कुंजू हिच्याशी लग्नगाठ बांधली. अतिशय खासगी स्वरुपात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात फक्त कुटुंब आणि मित्रपरिवारातील काही खास व्यक्तींचीच उपस्थिती पाहायला मिळाली. 

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये सनी आणि त्याची पत्नी हे पारंपरिक केरळी वेशात दिसत आहेत. शिवाय त्यांच्या गळ्यात तुळशीहारही दिसत आहेत. अतिशय आनंदात असणाऱ्या या नवविवाहित जोडीला मल्याळम चित्रपटसृष्टीतील नीविन पॉली, तोविओ थॉमस या कलाकांनीही शुभेच्छा दिल्या.