'तू काम मिळावं म्हणून कोणासोबत झोपली आहेस?' अभिनेत्रीला विचारलेल्या प्रश्नाने मोठा राडा

Actress Sparks Controversy: एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये या अभिनेत्रीला युट्यूबरने एक अगदीच बोल्ड प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर एकच राडा झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 20, 2024, 09:43 AM IST
'तू काम मिळावं म्हणून कोणासोबत झोपली आहेस?' अभिनेत्रीला विचारलेल्या प्रश्नाने मोठा राडा title=
या प्रश्नामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे

Actress Sparks Controversy: युट्यूबवरील एका प्रमोशनल मुलाखतीदरम्यान एका अभिनेत्रीला मुलाखतकाराने एवढा वाईट प्रश्न विचारला की या अभिनेत्रीला नेमकं काय बोलावं तेच कळेनासं झालं. हा सारा प्रकार घडलाय डीएनए नावाच्या मल्याळम चित्रपटाच्या प्रमोशनल मुलाखतीदरम्यान. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला मल्याळम चित्रपटसृष्टीमधील छळासंदर्भात म्हणजेच कास्टींग काऊचसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मात्र हा इतक्या वाईट पद्धतीने विचारला गेला की प्रश्न ऐकून अभिनेत्री मुलाखत अर्ध्यात सोडून निघून गेली. 

नेमका प्रश्न काय होता?

अभिनेत्री हन्ना रेजी कोशी आणि अश्कर सौदान हे प्रमोशनल मुलाखतीमध्ये अँकर असलेल्या सुहैलासोबत संवाद साधत होते. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तू कोणासोबत कधी शय्या केली आहेस का? असा प्रश्न या अँकरला विचारायचा होता. मात्र त्यावेळेस हन्नाला सुहैलाने हा प्रश्न फारच वाईट पद्धतीने विचारला. 'करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तू लोकांसोबत झोपली आहेस का?' असा सुहैलाने हन्नाला विचारला. हा प्रश्न ऐकून हन्नाला धक्काच बसला. प्रश्न ऐकून हन्ना सुन्न झाली. हा प्रश्न ऐकून अश्करनेही त्यावर आक्षेप घेतला. प्रश्न विचारण्याची आणि तो मांडण्याची पद्धत फारच चुकीची होती असं अश्कर म्हणाला. एका महिला अँकरकडून असा प्रश्न विचारण्यात आल्याबद्दल अश्करने आश्चर्य व्यक्त केला. एकीकडे अश्करने आक्षेप घेतला असताना दुसरीकडे हन्ना मात्र शांतच बसून होती. मात्र नंतर हन्नाने या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मुलाखतकार महिलेने तुम्ही चढ्या आवाजात का बोलत आहात असा उलट प्रश्न विचारला. आधीच वादग्रस्त पद्धतीने प्रश्न विचारुन अभिनेत्रीला मानसिक त्रास दिल्यानंतर या अँकरने आरेरावी करण्यास सुरुवात केली. 

..अन् बाचबाची सुरु झाली

अँकरची ही आरेरावी पाहून हन्ना आणि अश्कर या दोघांनीही आक्षेप घेतला. मुलाखतीमध्ये अचानक तिघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. हा वाद एवढा वाढला की दोघेही कलाकार मुलाखत अर्ध्यात सोडून गेली. हा घडलेला सारा प्रकार फारच अपमानास्पद होता असं हन्ना नंतर म्हणाली. आपल्याला दुखावलं जाईल अशाच पद्धतीने प्रश्न विचारण्यात आल्याचं ती म्हणाली. 

...म्हणून मी उठून निघून आले; अभिनेत्रीने सांगितलं कारण

"माझ्या वैयक्तिक आयुष्यावर हा हल्ला आहे असं वाटत असल्याने मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी प्रश्न विचारला असेल, पण हे चुकीचं आहे. मला हा संवाद पुढे सुरु ठेवावासा वाटला नाही म्हणून मी उठून निघून आले," असं हन्नाने अन्य एका युट्यूब चॅनेलला मुलाखत देताना म्हटलं. हन्नाने तिचा सहकलाकार अश्करचेही आभार मानले. हन्नाची बाजू घेत अश्करने अँकरला तिची चूक दाखवून दिल्याबद्दल तिने त्याचे आभार मानले.

मात्र मुलाखतकार महिला म्हणजे माझा प्रश्न बरोबरच, कारण...

अशाप्रकारे अभिनेत्रीला थेट प्रश्न विचारणं हा सुरुवातीला ठरवून केलेला प्रँक म्हणजेच गंमत वाटली. मात्र नंतर अँकर सुहैलाने मुद्दाम हा प्रश्न विचारण्यात आल्याचं स्पष्ट केलं. "अभिनय क्षेत्र हे माझं ड्रीम प्रोफेशन होतं. भूमिकेच्या मोबदल्यात माझ्याकडे अनेकदा चित्रपट निर्मात्यांनी शरीरसुखाच्या मागण्या केल्या आहेत. मला हन्नाला अपमानित करायचं नव्हतं. तर यावर तिची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. ती अनेक विषयांवर स्पष्टपणे आणि बेधडक भूमिका घेत बोलते म्हणून हा प्रश्न विचारला गेला. अनेक प्रश्नांवर ती गप्प होती. तिने बरेच प्रश्न अश्करकडे पास केले. म्हणून मी तिला तो प्रश्न विचारला आणि त्यानंतर तिची शांतता म्हणजे होकार आहे का असंही विचारलं," अशी प्रतिक्रिया सुहैलाने तिच्या 'शालूज बून' या युट्यूब अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत आपली बाजू मांडताना म्हटलं आहे.