मल्लिका शेरावतने व्हाइट बिकिनीमध्ये लावली आग, चर्चा तर होणारच...

 मल्लिका तिच्या बोल्ड स्टाईलची जादू चाहत्यांच्यावर कायम ठेवते. अशा परिस्थितीत मल्लिकाने पुन्हा एकदा आपला हॉट अंदाज शेअर करुन चर्चेचा विषय बनली आहे. 

Updated: Apr 16, 2021, 07:10 PM IST
मल्लिका शेरावतने व्हाइट बिकिनीमध्ये लावली आग, चर्चा तर होणारच...

मुंबई : मल्लिका शेरावत नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. मात्र मल्लिका आपल्या अभिनयाने देखील सर्वांना वेड लावते. मल्लिकाने तिच्या कारकीर्दीत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. मल्लिकाने अनेक मोठ्या आणि छोट्या सिनेमांत काम केलं आहे. मल्लिका देखील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, तिने हॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. अलीकडेच मल्लिकाने आपला बिकीनी फोटो शेअर करुन आपल्या चाहत्यांना वेड लावलं आहे.

मल्लिका शेरावत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. मल्लिका तिच्या बोल्ड स्टाईलची जादू चाहत्यांच्यावर कायम ठेवते. अशा परिस्थितीत मल्लिकाने पुन्हा एकदा आपला हॉट अंदाज शेअर करुन चर्चेचा विषय बनली आहे. मल्लिका चाहत्यांना स्वतःशी संबंधित माहिती सोशल मिडियाव्दारे शेअर करत असते. कायमच ती खास सेलिब्रेशन किंवा कोणत्याही सणाच्या शुभेच्छा तिच्या चाहत्यांना देत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

नुकतंच तिनं नविन वर्षात शेअर केलेले केरळमधील तिचे फोटो चाहत्यांना भेट म्हणून दिले असं म्हटलं तरी त्यात काही वावग ठरणार नाही. मल्लिकाने करिअरची सुरुवात टीव्हीवरील जाहिरातींमधून केली . यानंतर मल्लिकाने 'जीना सिर्फ मेरे लिए' या सिनेमांत एका छोटी भूमिका साकरली. यानंतर ती तिच्या 'ख्विश' आणि 'मर्डर' चित्रपटांमुळे चर्चेत आली.

'मर्डर' सिनेमांत बोल्ड सीन देऊन सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला होता. या चित्रपटात मल्लिकाने इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन दिले होते. हा चित्रपट त्या काळातील सगळ्याच बोल्ड सिनेमांपैकी एक आहे.