मुंबई : मल्लिका शेरावत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली. 'मर्डर' आणि 'प्यार के साइड इफेक्ट' सारखे बोल्ड सिनेमे देऊन मल्लिका सेक्सी अवतारासाठी हिट ठरली. तसेच ती आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे देखील चर्चेत आली आहे. असं असताना मल्लिका शेरावतने आता कास्टिंग काऊचबाबत आपला अनुभव सांगितला आहे. पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार मल्लिकाने मोठा खुलासा केला आहे. कास्टिंग काऊचमुळे मल्लिका शेरावतच्या हातून सिनेमा गेल्याचा तिने खुलासा केला आहे.
मल्लिका शेरावत आपल्या सिनेमाच्या शूटिंगनंतर को-स्टारसोबत जवळीक वाढवण्यात नकार दिला. आणि याच नकारामुळे मल्लिका शेरावतला सिनेमा गमवावा लागला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मल्लिका म्हणाली की, मला एका प्रोजेक्टमधून बाहेर काढलं कारण मी को-स्टार हिरोला नकार दिला. तू माझ्याशी जवळीक का साधत नाही? ऑनस्क्रीन जवळ येऊ शकतेस मग एकट्यात का नाही? असा सवाल को स्टारने विचारल्यावर नकार दिल्यामुळे चांगला प्रोजेक्ट हातातून गेल्याच मल्लिकाने म्हटलं आहे.
मल्लिका मुलाखतीत पुढे म्हणाली की, माणूस काय सवलत मिळवण्याचा प्रयत्न करते. तसेच आपण ज्याप्रमाणचे कॅरेक्टर करतो त्याप्रमाणेच आपल्याला समजलं जातं. जर तू शॉर्ट स्कर्ट घालत असशील, ऑन स्क्रीन Kiss केल तर ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात देखील तशीच असते असा समज होतो.