जॅकलिनसोबत ती व्यक्ती आहे तरी कोण? ज्यामुळे अडकली वादाच्या भोवऱ्यात

जॅकलिनला चॉकलेट  आणि महागड्या भेटवस्तू देवून जाळ्यात अडकवणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश   

Updated: Nov 27, 2021, 09:39 AM IST
जॅकलिनसोबत ती व्यक्ती आहे तरी कोण? ज्यामुळे अडकली वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या अभिनयामुळे आणि घायाळ अदांमुळे चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अडकलेल्या  जॅकलिन फर्नांडिस आणि महाठग सुकेश चंद्रशेखरमध्ये नक्की काय नातं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघे एकत्र वेळ व्यतीत करतना दिसत आहेत. जॅकलीन सुकेशसोबतच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

आजतकच्या रिपोर्टनुसार, फोटो त्यावेळचा आहेत जेव्हा सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो विमानाने चेन्नईला गेला आणि तिथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याने जॅकलिनची भेट घेतली. ज्या फोनमधून त्याने फोटो क्लिक केले आहेत. या फोनवरूनचं त्याने 200 कोटी रूपयांचं प्रकरण समोर आलं आहे.

डिसेंबरच्या सुरुवातीला अंमलबजावणी संचालनालय मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे. यामध्ये जॅकलीन आणि सुकेशच्या नात्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

कोण आहे सुकेश चंद्रशेखर 
बंगळुरूहून आलेल्या सुकेश चंद्रेशखर याला महागडं जीवन जगण्याची आवड आहे. जेव्हा सुकेशला बंगळुरू पोलिसांनी पहिल्यांदा पकडले तेव्हा तो केवळ 17 वर्षांचा होता. 

त्या दरम्यान त्याने कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून एका कुटुंबाची 1.14  कोटी रुपयांची फसवणूक केली. बंगळुरूमध्ये त्याचं वाईट काम उघडझाल्यानंतर तो चेन्नईला पळून गेला.