उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, 'अचानक सोसाट्याचा वारा आला तर....'

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....  

Updated: Nov 27, 2021, 08:35 AM IST
उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, 'अचानक सोसाट्याचा वारा आला तर....'

मुंबई : सगळ्यात लोकप्रिय रिऍलिटी शो 'बिग बॉस ओटीटी'ची स्पर्धक उर्फी जावेद बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून सतत चर्चेत आहे. टीव्ही स्टार असण्याबरोबरच, उर्फी सोशल मीडियाच्या जगात एक मोठं नाव आहे. उर्फी सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी आहे. ती तिच्या ड्रेसिंग सेन्सद्वारे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत राहिली आहे, आता उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की उर्फी जावेद पूर्ण फ्रंट ओपन वन पीस हुडी ड्रेसमध्ये फिरताना दिसत आहे. यादरम्यान तिचा स्वॅग नेहमीप्रमाणे पाहण्यासारखा आहे. व्हिडीओमधील उर्फीचा हा लूक अनेक चाहत्यांना आवडला असून काहींनी मात्र उर्फीला ट्रोल केलं आहे. ज्यामुळे उर्फी पुन्हा तिच्या विचित्र स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Urrfii (@urf7i)

लूकमुळे उर्फीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे  एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, 'कधीकधी आम्हाला वाटते की तू मुलगी नाहीस, तू देवाची भेट आहेस.' दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'राखी सावंत 2'. अन्य एका ट्रोलरने लिहिलं की, 'अचानक सोसाट्याचा वारा तर...' उर्फीचा असा लूक सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

तिने 'बिग बॉस ओटीटी'च्या घरात खूप घमाल केली. उर्फी तिच्या बोल्ड आणि फॅशन सेन्समुळे घरावर राज्य करत होती. शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत असते. कायम कोणत्या ना कोणत्या ड्रेसमुळे ती ट्रोलही होते. अलीकडे, उर्फी जावेद तिच्या जाळीदार ड्रेसमुळे देखील ट्रोल झाली होती.