close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

व्हिडिओ: ढोलकीवर थाप हवी तर अशी!

 मुलाची ढोलकीवरची थाप पाहून तुम्हीही म्हणाल, ढोलकीवर थाप असावी तर अशी...

Updated: Jul 22, 2018, 12:23 PM IST
व्हिडिओ: ढोलकीवर थाप हवी तर अशी!

मुंबई:  आजवर तुम्ही अनेक प्रकारचे संगीत ऐकले असेल, संगितकार पाहिले असतील. तसेच, पारंपरिक वाद्य असणारी वाद्येही ऐकली असतील. पण, या व्हिडिओत तुम्हाला पहायला आणि ऐकायला मिळणारे वाद्य तुम्हाला ताल धरायला लावेल. व्हडिओत एक मुलगा ढोलकी वाजवताना दिसतो आहे. या मुलाची ढोलकीवरची थाप पाहून तुम्हीही म्हणाल, ढोलकीवर थाप असावी तर अशी...

योगेश शर्मा नावाच्या एका युट्युब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या चॅनलवर दिलेल्या माहितीनुसार विशाल शर्मा असे या ढोलकीवादकाचे नाव आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ २ लाख १९ हजारपेक्षाही अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओत 'दो रास्ते' या चित्रपटातील छुप गये सारे नजारे गाण्यावर ढोलकी वाजवली आहे. या व्हिडिओने सध्या अनेकांना वेड लावले आहे.