मुंबई : झी युवा वरील फुलपाखरु मालिकेत मानस आणि वैदेही लवकरच विवाहबद्ध होणार आहे. २९ जुलैला यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी २ तासांच्या महाभाग प्रसारीत करण्यात येणार आहे. तर या आठवड्याभरात लग्नाची लगबग मालिकेत पाहता येईल. यात लग्नाची खरेदी, मेहंदी, व्याही भोजन, संगीत आणि हळद या कार्यक्रमांची रेलचेल असेल. मेहंदीच्या सोहळ्यानंतर आता संगीत समारंभाची लगबग सुरु झाली आहे.
या संगीत समारंभात वैदेही आणि मानसचे नातेवाईक आणि मित्रपरिवार सहभागी होणार आहे. इतकंच नाही तर यात दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. या आनंदात मानस-वैदेहीचा ही खास परफॉर्मन्स असणार आहे. मानसचे आई-बाबाही यावेळी आनंदात थिरकणार आहेत.
मग मानस-वैदेहीचा मित्रपरिवार या कार्यक्रमात कसा मागे राहिल? या संगीत सोहळ्यात अमित-वर्षा आणि तानिया यांचा रोमांटिक परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. तर चेतन आणि गौरव यांचे विनोद सर्वांना हसवणार आहेत. मानसच्या मित्रांनी 'आवाज वाढव डीजे' या गाण्यावर थिरकल्यावर वैदेहीच्या करवल्याही त्याला दमदार परफॉर्मन्सने उत्तर देणार आहेत.
दमदार परफॉर्मन्सने रंगलेल्या या सोहळ्याला मानस-वैदेहीचा कॅन्डललाईट परफॉर्मन्स अधिकच रंगत आणेल. तर मग तुम्हीही सहभागी व्हा मानस-वैदेहीच्या लग्नसोहळ्यात...