बोल्ड अभिनयानंतर निर्माते जबरदस्ती करायचे...., प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बोल्ड भूमिकेनंतर टॅगच लागला, नुसत्या तसल्या अभिनयाच्या ऑफर यायच्या, असं का म्हणाली ही अभिनेत्री

Bollywood Life | Updated: Aug 24, 2022, 01:53 PM IST
बोल्ड अभिनयानंतर निर्माते जबरदस्ती करायचे...., प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री ज्याचं आयुष्य एका भूमिकेने रातोरात बदलंल. एका रात्रीत ते मोठे स्टार झाले. अशाच रातोरात स्टार झालेल्या एका अभिनेत्रीने फिल्मी जगतातले धक्कादायक खुलासे केले आहेत. हे खुलासे एकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे फिल्मी जगतातले धक्कादायक खुलासे करणारी ही अभिनेत्री कोण आहे ते जाणून घेऊयात.   

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या बोल्ड अभिनयानंतर रातोरात चर्चेत आल्या होत्या. या अभिनेत्रींमध्ये मंदाकिनीचं नाव आघाडीवर आहे. 'राम तेरी गंगा मैली हो गई' या चित्रपटात तिने एक सीन दिला होता. या सीननंतर तिच्या या अभिनयाची खुप चर्चा रंगली होती. दरम्यान या सीनवर आता मंदाकिनीने धक्कादायक खुलासे केले आहेत. 

मंदाकिनी त्या सीनवर म्हणते की, 'राम तेरी गंगा मैली हो  गई' हा माझा पहिलाच चित्रपट होता. माझ्या पहिल्या चित्रपटात जेव्हा मी एक बोल्ड सीन केला तेव्हा खूप गदारोळ झाला होता. आज तर त्याहून बोल्ड भूमिका साकारल्या जातायत. माझ्या काळात मोठा वाद झाला होता, आज तिच लोक याला आर्ट म्हणतायत, असा टोला तिने हाणला. 

माझ्या त्या भूमिकेनंतर माझ्यावर एक टॅगच पडला होता. प्रत्येक निर्माता येऊन मला अंघोळीचा सीन करायची ऑफर द्यायचा. आंघोळीचा सीन चित्रपटात टाकण्याचा निर्माते जबरदस्तीचं करायचे. पण मी त्यांना नकार द्यायचे असे ती म्हणते. जर कोणत्या चित्रपटात तसा सीन केला तर योग्य पद्धतीने करायचे असे मंदाकिनी म्हणते.  

'तो' सीन करताना कसे वाटले?
राज कपूर एक असे निर्माता होते ज्यांच्यासोबत काम करणे अनेकांचे स्वप्न असायचे. ते जे काही म्हणायचे, त्याला संपुर्ण जग फॉलो करायचे. मग मी नवीन मुलगी अशी संधी जाऊ कशी देणार,असे मंदाकिनी म्हणते. ती पुढे म्हणते की, त्या काळात मला कोणतीही अस्वस्थता जाणवली नाही पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक निर्मात्यांबद्दल माझा सारखाच आत्मविश्वास असेल. म्हणूनच जेव्हा निर्माते ऑफर घेऊन यायचे तेव्हा मी त्यांनी म्हणायचे, ''तुम्ही मला योग्य कपडे द्या, मी पाण्याखाली बसून आंघोळीचा सीन करेन''.म्हणूनच पहिल्या चित्रपटानंतर पांढर्‍या साडीचा सीन कधीच रिपीट झाला नाही,असा खुलासा ती करते. 

'राम तेरी गंगा मैली हो गई' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मंदाकिनीने अनेक चित्रपटात भूमिका केली. यानंतर काही काळ चित्रपटातून ब्रेक घेतला होता. या ब्रेकनंतर आता जवळपास 25 वर्षांनी पुनरागमन करत आहेत. मंदाकिनी माँ हे संगीतमय गाण घेऊन आल्या आहेत. यानिमित्त मंदाकिनी यांनी त्यांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल आणि चित्रपटातील काही किस्स्यांबदल माहिती दिली.