मंदिरा बेदीच्या मुलीबद्दल मंदिराला ट्रोलर्सकडून वाईट भाषेत प्रश्न...मंदिरानेही समाचार घेत म्हटलं...

मंदिराने आपल्या दोन मुलांसोबत मजा करतानाच्या काही स्टोरीज इन्स्टावर शेअर केल्या आहेत, ज्यावर काही नेटकऱ्यांनी मुलगी ताराबद्दल अश्लील कमेंन्ट केल्या आहेत. 

Updated: Apr 13, 2021, 05:55 PM IST
मंदिरा बेदीच्या मुलीबद्दल मंदिराला ट्रोलर्सकडून वाईट भाषेत प्रश्न...मंदिरानेही समाचार घेत म्हटलं...

मुंबई : अभिनेत्री मंदीरा बेदीने कधी विचार देखील केला नसेल की, आपली मुलगी ताराबद्दल कोणी अश्लील भाष्य करेल. मंदिरा नेहमीच आपला मुलगा वीर आणि मुलगी तारा यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मंदिराने 2020मध्ये एक मुलगी दत्तक घेतली आणि तिचं नाव तारा बेदी ठेवलं.

नुकतच मंदिराने आपल्या दोन मुलांसोबत मजा करतानाच्या काही इन्स्टा स्टोरीज शेअर केल्या आहेत, ज्यावर काही नेटकऱ्यांनी मुलगी ताराबद्दल अश्लील कमेंन्ट केल्या आहेत. मंदीराला एका नेटकऱ्याने विचारलं, 'मॅडम, तुम्ही तुमच्या मुलीला कोणत्या झोपडपट्टी केंद्रामधून दत्तक घेतलं? तर दुसर्‍या नेटकऱ्यानं अशी कमेन्ट केली होती की, 'दत्तक घेतलेल्या मुलीमध्ये पूर्णपणे परकेपणा जाणवत आहे. तुम्ही लालची व्यसनी लोक या झोपडपट्टीतील मुलीला कायमचं घाबरवताना दिसत आहे.'

नेटकऱ्यांच्या अशा कमेंन्ट पाहून मंदिरा बेदी चागंलीच भडकली आहे. तिचा पारा चढला आहे. तिने या ट्रोर्लंसना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरा बेदी यांनी एकाला उत्तर देताना लिहिलं आहे की, 'अशा लोकांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्यावर माझं चांगलच लक्ष गेलं आहे. तर दुसर्‍या ट्रोलर्सला उत्तर देताना मंदिरा म्हणाली, 'मॉर्डन नागरिकही यात मागे नाही. तो स्वत: ला राजेश त्रिपाठी म्हणवतो, हे नक्कीच त्याचं नाव नाही, कारण असे आजारी सर्वात मोठे खोटे लोक आहेत, ज्यांना केवळ  ढालीमागे लपून त्यांची जीभ चालवता येते.'

मंदिरा बेदी यांनी ताराला ऑक्टोबर 2020 मध्ये दत्तक घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी एक फॅमिली फोटो शेअर केला आणि सांगितले की तारा आता त्याच्या कुटुंबातील एक भाग आहे. मंदिराने 1999 मध्ये राज कौशलशी लग्न केलं आणि लग्नाच्या 12 वर्षानंतर त्यांचा पहिला मुलगा वीर याचा जन्म झाला.