करण जोहर-मनीष मल्होत्राच्या रिलेशनशीप चर्चांवर मनीषने दिली 'ही' कबुली

बॉलिवूडमध्ये करण जोहर आणि त्याच्या मित्रांची नावं सतत चर्चेचा विषय बनलेला असतो. 

Updated: May 29, 2018, 08:41 PM IST
करण जोहर-मनीष मल्होत्राच्या रिलेशनशीप चर्चांवर मनीषने दिली 'ही' कबुली

मुंबई : बॉलिवूडमध्ये करण जोहर आणि त्याच्या मित्रांची नावं सतत चर्चेचा विषय बनलेला असतो. अशातच अनेकदा करण जोहरचं नाव फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत जोडलेले असते. त्यांचं रिलेशनशीपमध्ये असणं सतत चर्चेमध्ये असते. पण या गोष्टी दोघांकडूनही सतत 'अफवा' असल्याचं म्हटलं जातं. मात्र पुन्हा ही गोष्ट चर्चेला येणयामागे मनीष मल्होत्राची कमेंट कारणीभूत आहे.  

इंस्टाग्रामवर खास पोस्ट - 

नुकतेच करण जोहरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनिष मल्होत्राने दिलेल्या 'खास' लाईक इमोजीने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. करण जोहरच्या बर्थ डे विश पोस्टवर एका चाहत्याने तुमची जोडी छान दिसते. अशी कमेंट लिहली होती. त्यावर मनीषनेही लाईक करून दुजोरा दिला. 

 

 

मनिष मल्होत्राची प्रतिक्रिया काय? 

इंस्टाग्रामवर पोस्ट लाईक केल्यानंतर एका मुलाखतीमध्ये मनिषला हा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर 'करण आणि मी केवळ भाऊसारखे आहोत 'अशी प्रतिक्रिया दिली आहे.क्युटेस्ट कपल अशा कमेंटला लाईक केल्यानंतर मनिष आणि करण जोहरचं नातं चर्चेत आले होते. पण खुद्द मनिषने मीडियाला याबाबत त्याची बाजू स्पष्टपणे मांडल्यानंतर त्या दोघांच्या नात्याबद्दल होणार्‍या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.