Akshay Kumar मुळे Manoj Pahwa यांचा संसार आला होता धोक्यात; नेहा धुपियाने निर्माण केला गैरसमज, मग...

शूटिंगच्या वेळी एकदा मनोजची पत्नी अभिनेत्री सीमा पाहवा हिचा फोन आला आणि तो फोन अक्षय कुमारने उचलला. त्यानंतर जे काही सांगितलं....

नेहा चौधरी | Updated: Aug 27, 2024, 11:55 AM IST
Akshay Kumar मुळे Manoj Pahwa यांचा संसार आला होता धोक्यात; नेहा धुपियाने निर्माण केला गैरसमज, मग... title=
Manoj Pahwa marriage was in danger because of Akshay Kumar Neha Dhupia created a misunderstanding

बॉलिवूड स्टार आणि फिटनेस प्रिय अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याचा शिस्तप्रिय स्वभावामुळे ओळखला जातो. पण त्याच्या अजून एका सवयीमुळे सुप्रसिद्ध अभिनेता मनोज पाहवा (Manoj Pahwa) यांच्या संसार धोक्यात आला होता. अक्षय कुमारच्या या कृतीबद्दल खुद्द मनोज पाहवा यांनी सांगितलंय. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनोजने हा किस्सा सांगितलाय. 

मनोजने अक्षयसोबत 'सिंग इज किंग' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मनोज संसार याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान धोक्यात आला होता. जवळ जवळ त्यांचं लग्न मोडण्यात जमा होतं. याबद्दल सांगताना ते म्हणाला की, ऑस्ट्रेलियात शूटिंगदरम्यान अक्षयच्या खोडकरपणामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात भूकंप आला होता. 

शूटिंगदरम्यान एके दिशी मनोजची पत्नी अभिनेत्री सीमा पाहवा हिने फोन मनोज यांना फोन केला आणि हा फोन अक्षयने उचलला. अक्षयच्या खोडकर स्वभावाने त्याने फोनवर आपण मनोज बोलतोय, असं बोलायला सुरुवात केली. सीमालाही मनोजशी बोलतोय असंच वाटलं.

मात्र, काही वेळातच पतीचा आवाज नसल्याचं सीमाने ओळखलं. मात्र अक्षयची प्रँक एवढ्यावरच थांबला नाही, उलट त्याने आणखी एक मोठी प्रँक केला. त्याचा विनोद आणखी पुढे नेण्यासाठी त्याने चित्रपटात त्याची सहकलाकार नेहा धुपियाचाही (Neha Dhupia) समावेश केला. अनोळखी महिला असल्याचे भासवत नेहाने 'मनोज बाथरूममध्ये आहे' असं सीमाला सांगितलं. पण सीामा हुशार अक्षय आणि नेहा यांच्या या प्रयत्नाला यश आलं नाही. सीमाचा विश्वास डगमगला नाही. 

या प्रँकचा किस्सा सांगत असताना मनोज पुढे म्हणाले की, 'अक्षयने ही जोरदार प्रँक करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण सीमा आणि माझं लग्न होऊन इतकी वर्षे झाली आहेत की असं काही होणार नाही याची तिला खात्री आहे. आम्ही एकमेकांना थोडे चांगले ओळखतो. अक्षयचा हा प्रँक कदाचित यशस्वी झाला नसेल, पण अक्षयला त्याच्या कॉस्टार्ससोबत किती मजा येते आणि त्यांच्यासोबतचे बॉन्डिंग किती चांगले आहे हे यावरून नक्कीच दिसून येतं. 

'सिंह इज किंग' हा अक्षयच्या कारकिर्दीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक असून तो खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटात अक्षयसोबत कतरिना कैफ, ओम पुरी, किरण खेर, रणवीर शौरी आणि नेहा धुपिया या झळकल्या होत्या.