..यामुळे दिलनवाज शेख बनली मान्यता दत्त

का बदललं नाव

..यामुळे दिलनवाज शेख बनली मान्यता दत्त

मुंबई : संजय दत्तचा नुकताच 'साहेब, बीवी आणि गँगस्टर 3' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. पण या सिनेमापेक्षा संजय दत्तची बायोपिक 'संजू' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला अधिक पडला आहे. संजू या बायोपिकमधून संजय दत्तच्या जीवनातील अनेक गुपित जगासमोर आली आहेत. या बायोपिकमध्ये हे देखील दाखवलं आहे की, संजय दत्तची पत्नी मान्यता त्याच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे हे सांगितलं आहे. 

जेव्हा संजय दत्तला कुणीच आधार दिला नाही तेव्हा मान्यता त्याच्यासोबत एखाद्या सावलीप्रमाणे होती. मान्यताने 2008 मध्ये संजय दत्तशी लग्न केलं. त्याअगोदर तिचं नाव दिलनवाज शेख असं होतं पण लग्नानंतर तिने नाव बदलून मान्यता ठेवलं. एका मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, संजय दत्तने तुला माहेरचं नाव ठेवण्यास परवानगी दिली नाही का? तेव्हा मान्यता म्हणाली की, हा माझा खाजगी प्रश्न आहे. संजय दत्तला माझ्या माहेरच्या नावावरून खूप अपमान आणि लोकांचा द्वेष सहन करावा लागला असता असं मान्यता सांगते. 

2008 मध्ये संजय दत्तने मान्यतासोबत गोव्यात लग्न केलं. संजय दत्त मान्यतापेक्षा जवळपास 20 वर्ष मोठा आहे. मान्यताचे हे दुसरे लग्न आहे. संजय दत्तच्या अगोदर मान्यताने मिराज उल रहमान या व्यक्तीशी लग्न केलं होतं. मिराजवर असे आरोप लावण्यात आले आहेत की, तो बॉलिवूडमधील अभिनेत्रींना धमकीचे फोन करत असे. यामुळे मिराजला शिक्षा देखील झाली होती.