मराठी अभिनेता अतुल तोडणकरची अमेरिकेत बिघडली प्रकृती; फोटो पाहून बसेल धक्का

सध्या अतुल 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकानिमित्त परदेश दौरा करत असतानाच त्याच्यावर खूप मोठं संकट ओढवलं. स्टार प्रवाह वरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका कुकी म्हणजेच अभिनेता अतुल तोडणकर मालिकेतून ब्रेक घेत परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. 

Updated: Oct 17, 2023, 02:53 PM IST
मराठी अभिनेता अतुल तोडणकरची अमेरिकेत बिघडली प्रकृती; फोटो पाहून बसेल धक्का title=

मुंबई : स्टार प्रवाह वरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका कुकी म्हणजेच अभिनेता अतुल तोडणकर मालिकेतून ब्रेक घेत परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. मालिकेतू कुकी कामानिमित्त मुंबईत गेला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र खऱ्या आयुष्यात कुकी 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत आहे. 

सध्या अतुल 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकानिमित्त परदेश दौरा करत असतानाच त्याच्यावर खूप मोठं संकट ओढवलं. नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अतुल आजारी पडला असल्याचं कळलं. मात्र आजारी पडूनही अतुलने नाटकाच्या प्रयोगांत कोणताही खंड पडू दिला नाही. नुकतीच अतुलने त्याच्या फेसबूकवरुन एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती त्याने त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता आजारी असल्याचं दिसत आहे. त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं दिसत आहे. ही पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं की,  ''आज एका लग्नाची पुढची गोष्ट या आमच्या नाटकाचा दुसरा अमेरिका दौरा संपला.. खूप संमिश्र आठवणी. SHOW MUST GO ON.माझा हा अमेरिका चा तिसरा दौरा..मोठेपणा मिरवत नाहीय म्हणजे तशी इथल्या वातावरणाची सवय आणि अंदाज आलाय.. पण या वेळेस गंम्मत केली अमेरिकेने.हाऊसफ़ुल्ल शो चालू होते. शिकागो, सेंट लुईस आणि डॅल्लस चा शो झाल्यावर मला शिंगल्स चा त्रास झाला.. म्हणतात की कांजन्याची वायरल इन्फेक्शन.. 

अर्धा चेहरा आणि डोळा सुजला होता.. पण अमेरिकेचे दर्दी रसिक प्रेक्षक, त्यांचा तुफान प्रतिसाद, आमची नाटकाची टीम आणि आमचा जादूगार प्रशांत दामले यांच्यासमवेत, त्या प्रत्येक तीन तासात काहीतरी घडायचं आणि प्रयोग पार पडायचा.. आज आमची दौऱ्याची सांगता झालीय आणि मी पूर्ववत होतो तसा झालोय.. हीच तर नाटकाची गंम्मत आहे मित्रांनो 
या दोन्हीही वीकएंड ला प्रत्येक सेंटरला निष्णात डॉक्टर तैनात होते, ट्रीटमेंट उत्तम चालू होती.. प्रशांत सर, आऊ, कविता आणि माझ्या संपूर्ण टीम चा मी ऋणी आहे.. Ajay- Vasudha Nihaar Patwardhan Atul Aranke, Rahul Karnik, सर्वांना खूप खूप प्रेम.'' अनेकजण अतुलच्या या पोस्टच्या खाली कमेंट करत काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.