Personality Test : तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमचा मोबाईल कसा हातात धरता यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या अनेक गोष्टी समजतात? तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अंदाज लावायचा असेल तर केवळ तो व्यक्ती त्याचा मोबाईल कसा हाताळतो हे पाहून तुम्ही हा अंदाज लावू शकता. मोबाईल वापरण्याच्या स्टाईलवरुन एखाद्याचं व्यक्तिमत्व कसं ओळखू शकता हे आज आपण जाणून घेऊया...
जर एखादा व्यक्ती एका हातात मोबाईल पकडून त्याच हाताच्या अंगठ्याने जर त्याच्यावर काम करत असेल तर तो व्यक्ती आशावादी आणि आत्मविश्वासू असतो. याशिवाय हा व्यक्ती आयुष्यात खूप लवकर प्रगती करायची इच्छा बाळगतो. या व्यक्ती संकटांना अजिबात न घाबरता नेहमी कठोर परिश्रम करण्यास तयार असतत.
दोन्ही हातांनी मोबाईल पकडून त्यापैकी एका अंगठ्याचा मोबाईल वापरणारी व्यक्ती एक सावध व्यक्ती असल्याचं दर्शवते. असा व्यक्ती कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व प्रकारच्या धोक्यांची शक्यता चाचपून घेतो. कोणताही पाऊल टाकताना दहावेळा विचार करतो. तो सहसा सहजी कोणावर विश्वास ठेवत नाही. याव्यतिरिक्त अशा व्यक्तीमध्ये बुद्धिमान आणि सहानुभूतीशील हे गुन देखील असतात
दोन्ही हातांनी मोबाईल धरून आपल्या दोन्ही अंगठ्यांचा वापर करणारे व्यक्ती प्रचंड उत्साही आणि हुशार असतात, शिवाय ते प्रत्येक गोष्टीत आनंदी राहण्याचा त्यांचा स्वभाव असतो. असे व्यक्ती स्वभावाने फार भोळे आणि निरागस असतात ज्याचा कधीकधी त्यांना तोटा देखील होतो.
असे लोक स्वभावानं खूपच साधे आणि सोपे असतात, अशा लोकांना साहसी कृत्य करण्याच विशेष शौक असतो, अशा व्यक्तींची कल्पनाशक्तीही खूप दांडगी असते. त्यामुळे आता या गोष्टींचा वापर करुन तुमच्या आजुबाजूची व्यक्ती कोणत्या स्वभावाची आहे हे ओळखू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)