सचिन तेंडुलकरसोबत 'हा' मराठी अभिनेताही घ्यायचा आचरेकरांकडे क्रिकेटचे प्रशिक्षण, म्हणाला 'त्याची बॅटिंग बघून...'

जवळजवळ वीस पंचवीस वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलो होतो क्रिकेटची बॅट हातात धरली होती, माझे जुने शिवाजी पार्क मधले दिवस आठवले

नम्रता पाटील | Updated: Apr 28, 2024, 04:31 PM IST
सचिन तेंडुलकरसोबत 'हा' मराठी अभिनेताही घ्यायचा आचरेकरांकडे क्रिकेटचे प्रशिक्षण, म्हणाला 'त्याची बॅटिंग बघून...' title=

Milind Gawali Cricket Training With Sachin Tendulkar : मुंबईसह महाराष्ट्रात क्रिकेट हा खेळ मोठ्या आवडीने खेळला जातो. मैदान, रस्ता, गच्चीपासून ते अगदी एखाद्या मोकळ्या ठिकाणी क्रिकेट खेळला जातो. भारतात क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड आहे. रविवारचा दिवस असला की सर्वच ठिकाणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची गर्दी पाहायला मिळते. आता याच निमित्ताने एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्याने सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासोबत रमाकांत आचरेकरांकडे क्रिकेटचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. ते सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारताना दिसतात. ते कायमच सोशल मीडियावर सक्रीय असतात. आता मिलिंद गवळींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते क्रिकेट खेळताना दिसत आहेत. यानिमित्ताने त्यांनी एक खास आठवण सांगितली आहे. 

मिलिंद गवळी यांची पोस्ट 

क्रिकेट फिवर, रविवार सुट्टीचा दिवस. माझा भाचा शिवम म्हणाला “ मामाजी दर रविवारी आम्ही सगळे मित्र क्रिकेट खेळतो आमच्याबरोबर क्रिकेट खेळणार का ?” जवळजवळ वीस पंचवीस वर्षानंतर कोणीतरी मला विचारलं “ क्रिकेट खेळणार का ? “ आज सकाळी एक पुण्यात meeting होती, लगेच मी ती meeting postponed केली, आणि पहाटे ५.०० वाजता आम्ही रावेत ला निघालो, ६.०० वाजे पर्यंत एक एक शिवम चे मित्र जमा व्हायला लागले.

कोणी वकील तर कोणी businessman, तर कोणी student , पण actor या जमाती मधला मी एकटाच होतो, कुणी मला मामा म्हणे कोणी मला काका म्हणे, पण त्यांच्यामध्ये एक उंच असा मुलगा होता त्याचं नाव होतं अनिरूद्ध, कोणी ही त्याला हाक मारली की मला उगाचच वाटत होतं की मलाच बोलतायत, जवळजवळ वीस पंचवीस वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलो होतो क्रिकेटची बॅट हातात धरली होती, माझे जुने शिवाजी पार्क मधले दिवस आठवले, असंच रविवारी सकाळी आचरेकर सर कॅच प्रॅक्टिस द्यायचे, कदाचित त्या शाळेमधल्या प्रॅक्टिस मुळेच आज तीन कॅच पकडता आल्या, आमच्या शाळेमध्ये म्हणजे शारदाश्रम विद्यामंदिर दादर मध्ये विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांनी admission घेतल्यानंतर, त्यांची बॅटिंग बघून माझ्या लक्षात आलं होतं की हा खेळ "अपने बस की बात नही है"

इतक्या वर्षानंतर आज परत या पोरांना बघून सुद्धा तेच वाटलं की हे "आज भी अपने बस की बात नही है" आजकालची मुलं ही खूपच छान खेळतात, turf club च्या जाळ्या इतक्या उंच होत्या तरीसुद्धा सात बॉल हरवले, या वीस-बावीस मुलांचा मी आभारी आहे कारण मी त्यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान असून सुद्धा त्यांनी मला आज खेळायला घेतलं. या सगळ्यांच्या उज्वल भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असे मिलिंद गवळींनी सांगितले आहे.

सध्या मिलिंद गवळी हे मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे अभिनेते आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकात काम केले आहे. पण त्यांना आई कुठे काय करते या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सध्या ते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारत आहेत.